विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय च्या कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांची निवड

नंदुरबार
Share This:

विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय च्या कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांची निवड

 

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत नंदुरबार जिल्हा कार्यकारणी गठित करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना धुळे येथील प्रदेशाध्यक्ष भिमराज घुगरे यांनी नियुक्ती पत्र दिले. यासंदर्भात नुकतीच नंदुरबार गवळी समाज युवकांची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पंच प्रकाश घुगरे होते. यावेळी विविध सामाजिक उपक्रम आणि समस्या यासंदर्भात चर्चा करण्यात आली.भिमराज घुगरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धुळे येथील किसन जोमीवाळे, नाना आंजीखाने, योगेश घुगरे उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा कार्यकारणी याप्रमाणे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल भटू लगडे, कार्याध्यक्ष महादू विठ्ठल हिरणवाळे,जिल्हा सचिव तथा खजिनदार अशोक वाघोजी यादबोले, जिल्हा संघटक राजेंद्र लक्ष्मण लगडे, तसेच लक्ष्मण यादबोले, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाआप्पा हुच्चे, कायदेशीर सल्लागार अँड सुशिल गोडळकर, तालुका अध्यक्ष ईश्वर घुगरे, नंदुरबार शहर अध्यक्ष हेमंत नागापुरे, शहर उपाध्यक्ष आनंदा घुगरे, जेष्ठ सल्लागार प्रकाश घुगरे, प्रा. गंगाराम यादबोले यांचा समावेश आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *