
नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा उघडणार; बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई (तेज समाचार डेस्क): नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे, असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.
शाळा सुरु करताना शाळेमध्ये पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. प्रत्येकाची तपासणी करण्यात येईल. पूर्ण शाळा निर्जंतुक करण्यात येईल आणि पूर्ण खबरदारी घेऊनच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असंही बच्चू कडू यांनी सांगितलंय.