
गुर्जर परिषदेच्या युवा प्रदेश सचिव पदी सतीश गुर्जर
शिरपूर (मनोज भावसार) . शिरपूर तालुक्यातील कुवे येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश गोकुळ गुर्जर (पाटील) यांची अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा प्रदेश संघटन सचिव पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ. दिग्विजय पाटील यांचे आदेशानुसार व राष्ट्रीय सल्लागार नवलसिंग पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील पाटील, राष्ट्रीय सचिव बन्सीलाल पाटील यांचे सूचने नुसार ही निवड करण्यात आली आहे. सतीश गुर्जर यांनी गेली अनेक वर्षापासुन समाज कार्यात काम केले असुन आतापर्यंत त्यांनी तालुकास्तरावरुन जिल्हा पातळीवर विविध जबाबदारी यशस्वी पार पाडली आहे. सतीश गुर्जर यांनी दिलेली जबाबदारी स्वीकारून युवकांचे संघटन व गुजर समाजाच्या विविध समस्यांना दूर करण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करून पदाला न्याय देऊ असे सांगीतले. त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक व राजकिय श्रेत्रातील विविध मान्यवरांसह कुवे सरपंच प्रवीण गुजर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.