पुणे : कोरोना रुग्ण वाढत असल्याने ससून आणि नायडू रुग्णालयात बेड अपूरे

Featured पुणे
Share This:

पुणे (तेज समाचार डेस्क). पुणे आणि पुण्याचे शेचारी शहर पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या आठवड्यात चाळीसहून अधिक रुग्णांची भर पडल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डोकेदुखी वाढत चाचली आहे. नायडू, ससून रुग्णालयासह भारती हॉस्पिटलमधील आयसोलेशन बेड ‘फुल्ल’ झाले आहेत. त्यामुळे आता शहरातील अन्य खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा विचार महापालिका प्रशासन करीत आहे.

गेल्या आठवड्यापासून चाळीसपेक्षा अधिक रुग्णांची संख्या वाढली. सध्या पालिकेच्या नायडू रुग्णालय, ससून रुग्णालयासह खासगी भारती हॉस्पिटलमध्ये आयलोसेशन तसेच काही प्रमाणात अतिदक्षता विभागाच्या (आयसीयू) बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. मार्च महिन्यापासून ते 19 एप्रिलपर्यंत आयसोलेशनच्या बेड्सची क्षमता ‘फुल्ल’ झाली आहे.

ससून रुग्णालयात 100, नायडू रुग्णालयात 120 तसेच भारती हॉस्पिटलमध्ये 135 बेड्स आयसोलेशनची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, सध्या गेल्या काही दिवसांपासून करोनाचे ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण वाढत आहेत. संशयितांची चाचणी केल्यानंतर त्यांना लागण झाल्याचे निदान होत आहे. त्यामुळे त्यांना सुरुवातीला क्वारंटाइन केल्यानंतर पुन्हा आयसोलेशन करावे लागत आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांना आयसोलेशन वॉर्डात ठेवावे लागत आहे. सध्या ससून रुग्णालयातील जागा संपूर्ण भरली आहे. त्याशिवाय नायडू रुग्णालयातील जागाही भरल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांत आजमितीला आयसोलेशन वॉर्डातील चार ते पाच बेड रिकाम्या आहेत. त्यातच पुन्हा रात्रीच्या वेळी रुग्ण आल्यास त्याला माघारी पाठविणे शक्य नसते. त्यामुळेच त्या रिकाम्या ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण रुग्णालये भरल्याने खासगी रुग्णालयाकडे काही रुग्ण पाठविले जात आहेत. त्यात भारती हॉस्पिटलमधील बेड्ची क्षमता पूर्णपणे भरली आहे.

येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढली, तर पर्याय काय असा प्रश्न पालिकेच्या आरोग्य विभागाला सतावत आहे. त्यासाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेता येतील का या संदर्भात विचारविनिमय सुरू आहे. महापालिका प्रशासन पातळीवरही विचार सुरू असून, खासगी वसतिगृहांची चाचपणी करण्यात आली आहे. काही वसतिगृहे ताब्यात घेण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

– 15000 बेडची अजून आावश्यकता
सध्या लॉकडाउन सुरू आहे. तरीही रुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. सध्याच्या जागतिक साथीचा विचार करून हाफकिन संस्था आणि साथरोगाच्या अभ्यासाच्या आधारावर काही संस्थांनी संशोधन केले आहे. त्यावरून पुण्यासह महाराष्ट्रात साथीची काय स्थिती असेल याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यातून पुण्यात येत्या काही दिवसांत साथीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवडची लोकसंख्या पाहता दोन्ही शहरात मिळून रुग्णांचा आकडा सुमारे 10 हजार ते 15 हजारांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तेवढे रुग्ण आढळतील की नाही असे थेट सांगणे अशक्य असून, परिस्थितीचा अंदाज घेऊन रुग्णांची संख्या वाढू शकते. त्यामुळे त्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता आजमितीला खासगी रुग्णालयात 15 ते 16 हजार बेडची क्षमता आहे. त्यामुळेच शहरातील सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घ्यावी लागतील, असे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

– रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता
सध्या संशयित अथवा पॉझिटिव्ह रुग्णांना आयसोलेशन, क्वारंटाइन केले जात आहे. त्यानुसार स्वतंत्र ठिकाणी रुग्णाला ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. येत्या महिनाभरात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या धोरणात काही बदल करावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. रुग्णाला दाखल करून घेताना यापुढे कोणत्या स्वरुपाच्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागेल, कोणत्या रुग्णाला त्वरित डिस्चार्ज देता येईल या संदर्भातील धोरणात बदल करावा लागणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *