
मोहन भागवत यांनी घेतली कोरोनाची लस
नागपूर (तेज समाचार डेस्क): संपूर्ण देशात 1 मार्चपासून कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण करून घेतल्यानंतर अनेक राजकिय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी कोरोनाची स्वदेशी लस घेण्यास सुरूवात केली. पंतप्रधानांनी काही दिवसांपुर्वीच स्वदेशी लस घेतल्यानंतर कोरोनामुक्त भारत करण्याचं आवाहन केलं होतं.
नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी नागपूरमध्ये लस घेतली आहे. नागपूरच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी कोरोनाची लस घेतली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही कोरोनाची लस घेतली आहे. कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित असून सर्व जनतेनी त्यासाठी नोंदणी करावी आणि आपली वेळ आल्यानंतर लस घ्यावी असं आवाहन त्यांनी या वेळी जनतेला केलं होतं. त्याचबरोबर शरद पवार, सुप्रिया सुळे इत्यादी नेत्यांनीही लसीकरण करून घेतलं आहे.
राजकीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणात लस घेण्यास सुरुवात केली असताना काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी काही दिवसांपुर्वी कोरोनाची लस तरुणांना आधी दिली पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं.