
सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे विशेष ‘डिजिटल बौद्धिक’
सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे विशेष ‘डिजिटल बौद्धिक’
नागपूर (तेज समाचार डेस्क): जागतिक कोरोना संकट आणि देशव्यापी संचारबंदीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर सामाजिक संस्था देशाच्या कानाकोप-यात सेवा कार्य करीत आहे. या कठीण प्रसंगात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत वर्तमान परिस्थिती आणि संघाची भूमिका (वर्तमान परिदृश्य एवं हमारी भूमिका) या विषयावर स्वयंसेवक आणि नागरिकांचे मार्गदर्शन करणार आहेत.
या विशेष ‘ डिजिटल ‘ बौद्धिक वर्गाचे आयोजन 26 एप्रिल संध्याकाळी 5 वाजता करण्यात आले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यु-टुयब तसेच फेसबुक हॅन्डल द्वार या कार्यक्रमचे थेट प्रक्षेपण नागरिकांना पाहता येईल. सर-संघचालक डॉ मोहन भागवत यांच्या या डिजिटल व्याख्यानाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नागपूर महानगर संघचालक सी ए राजेश लोया यांनी केले आहे.
कोरोना संकटाची तीव्रता लक्षात घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एप्रिल ते जून महिन्या दरम्यान होणा-या जवळपास 90
पेक्षा जास्त संघशिक्षा वर्ग आणि इतर सार्वजनिक आणि सामूहिक कार्यक्रमांना रद्द केले आहे. संघाचे सह-सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी ट्विटर द्वारे एका अधिकृत पत्राद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी मागील महिन्यात बंगळुरू येथील वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा देखील कोरोनाच्या पार्श्व्वभूमीवर रद्द केली होती. एप्रिल
ते जून या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्राथमिक, प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग असतात. यात संघाचे सरसंघचालक, सर-कार्यवाह आणि अन्य अखिल भारतीय अधिकारी उपस्थित असतात.
प्रथम वर्ष प्रांत स्तरावर, द्वितीय वर्ष क्षेत्र स्तरावर आणि अखिल भारतीय स्तराचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग नागपुरात आयोजित केला जातो.