
यावल येथील कुंभार टेकडीवर संतगोरोबा कुंभार जयंती मोठ्या उत्साहात साजरी
यावल येथील कुंभार टेकडीवर संतगोरोबा कुंभार जयंती मोठ्या उत्साहात साजरी
यावल ( सुरेश पाटील): श्री संत गोरोबाकाका कुंभार यांची754 वी जयंती आज सोमवार रोजी यावल येथील कुंभार टेकडीवर मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
श्री संतशिरोमणी गोरोबा काका कुंभार जंयती निर्मित्त यावल येथे दि.19/7 /2021 सोमवार रोजी सकाळी10वाजता शहरातील कुंभार टेकडीवर श्री संतशिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या प्रतिमेचे पुजन माजी भाजपा वैद्यकीय तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, अँड गोविंद बारी व माजी नगरसेवक पुंडलिक बारी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक समिर शेख, युवासेना शहर अधिकारी सागर देवांग,जुगल घारू,नरेन्द्र शिंदे, जय स्वाभिमानी कुंभार समाज विकास संस्था जिल्हा युवक अध्यक्ष विजय पंडित,युवा अध्यक्ष राजू कुंभार,संजय कुंभार, सुधाकर कुंभार,सुरेश कुंभार, जगन कुंभार,विलास कुंभार, सुनिल कुंभार,छोटू कुंभार,अनिल कुंभार यांच्यासह समाज बांधव व नागरीक सहभागी झाले होते.