
सावळदे येथे सॅनिटाइजरची फवारणी
सावळदे ता. शिरपुर – येथे काल दि. 23 राेजी गॅलेक्सी गृपचे संचालक सचिन राजपूत यांनी स्वखर्चाने गावात अत्याधुनिक यंत्राद्वारे सॅनिटाइजरची धुरळणी केली. सचिन राजपूत कुठल्याही पदावर नसतांना त्यांच्या माध्यमातून गावात व पंचक्रोशीत विविध उपक्रम राबविले जातात. तर काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी त्यांच्या वतीने मास्क, सॅनिटाइजर, हॅन्डग्लाेज, साबण, माेफत भाजीपाला, पाणी बाॅटलचे लाॅकडाऊन काळात वाटप करण्यात येत आहे.
काेविड १९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता ग्रामीण भागात देखील काेराेना विषाणूने बाधीत रूग्ण आढळून येत असल्याने ग्रामीण भागात जनजागृती सह कृती देखील महत्वाची आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी अनेक युवा व समाजसेवी संस्था मदतीचा हात देत आहेत. असाच पुढाकार घेत सचिन राजपूत यांनी संपुर्ण सावळदे गावात सॅनिटाइजरची धुरळणी केली. यासाठी पदमसिंग राजपूत, अतुल राजपूत, अशाेक राजपूत, राकेश राजपूत, विशाल राजपूत, दिपक राजपूत, रणविर राजपूत, आशिष राजपूत, ऋषीकेश राजपूत, प्रणव राजपूत, राज राजपूत, सचिन जगदेव, श्रीपाल राजपूत, रविंद्र राजपूत, नामदेव मिस्तरी, शक्तिराज राजपूत, युवराज राजपूत, भटेसिंग राजपूत, गजेंद्र राजपूत, महेंद्र राजपूत यांच्यासह युवा व ग्रामस्थ सावळदे यांचे सहकार्य लाभले.