संगीतम ट्रॅव्हल्स चालक मालकाकडून- प्रवाशांची फसवणूकप्रवाशाला यावल येथे न सोडता उतरविले तापीनदी पुलाजवळ

Featured जळगाव
Share This:

संगीतम ट्रॅव्हल्स चालक मालकाकडून प्रवाशांची फसवणूक

प्रवाशाला यावल येथे न सोडता उतरविले तापीनदी पुलाजवळ.

आरटीओ आणि ग्राहक मंचाकडे तक्रार करणार.

यावल दि.17(सुरेश पाटील)दररोज पुणे ते यावल प्रवासी वाहतूक करणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्स चालक/ मालकाने दि.12रोजी बुकिंग करून संध्याकाळी पुणे येथून भुसावळ मार्गे यावल येथे येणाऱ्या एका प्रवाशाला दि.13 रविवार रोजी सकाळी यावल येथे न सोडता भुसावळ येथील तापी नदी पुलाजवळ उतरवून दिल्याने त्या प्रवाशाला मोठा आर्थिक व मनस्ताप सहन करावा लागला विशेष म्हणजे ट्रॅव्हल्स मालक आणि प्रवासी दोघ हे यावल तालुक्यातील रहिवासी असल्याने तसेच पोलीस,आरटीओ आणि इतर शासकीय यंत्रणेशी हितसंबंध असल्याने ट्रॅव्हल्स मालकाला त्याच्या व्यवसायाचा सामाजिक आणि राजकीय कार्याचा प्रभावाचा मोठा आत्मविश्वास असल्याने त्याने प्रवासी वाहतुकीचे आणि ट्रॅव्हल्स व्यवसायाचे सर्व नियम खड्ड्यात घातले.
पुणे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने तथा ग्राहकाने खालील प्रमाणे बुकिंग केली होती आणि आहे.
redBus mTicket
Route: Pune to Yawal
Ticket No: TQ7A56828631
Primary Passenger: Gaurav patil 27, MALE
PNR: 122583431
Trip Code: 52336
Travels: Sangitam Travels
Departure: 07:40 PM Jun 12, 2021
Seat Numbers: 19U
Boarding point: New Sangavi – Pick up near Sangavi Phata 9595954114,9028535222,9028537222
Address: New Sangavi – Pick up near Sangavi Phata 9595954114,9028535222,9028537222
Boarding point contact: N/A
Sangitam Travels Customer Care: 9595954114
Check your ticket : https://s.redbus.com/sibg8cu
redBus Support: https://www.redbus.in/info/redcare
Please Note: It is mandatory to follow the travel guidelines of your source and
destination state for travel. View Guidelines: https://s.redbus.com/udwdp75
अशाप्रकारे बुकींग असताना संगीतम ट्रॅव्हल्स चालकांने यावल येथे जाणाऱ्या प्रवाशाला यावल येथे न सोडता भुसावळ येथील तापी नदी पुलाजवळ सकाळी उतरवून दिल्याने आणि त्याची यावल येथे जाण्याची व्यवस्था न केल्यामुळे ट्रॅव्हल्स चालकाच्या मनमानी व सोयीच्या कृत्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानी कारभारावर बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून जिल्ह्यातील इतर काही अनेक ट्रॅव्हल्स चालक मालक हे सुद्धा मनमानी पद्धतीने यावल रावेर सावदा फैजपूर चोपडा भुसावल जळगाव इत्यादी ठिकाणाहून किंवा पुणे येथून या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडून वेळेची संधी आणि प्रवाशांची मजबूरी लक्षात घेता वाजवीपेक्षा जास्त भाड्याची आकारणी करून आर्थिक लूट करीत आहे,आरटीओ विभागाने यांना प्रवासी वाहतुकीचे दर ठरवून दिलेले आहेत किंवा नाही?ट्रॅव्हल्स बस चालक/मालकांवर पोलीस आरटीओ आणि इतर संबंधित यंत्रणेचे नियंत्रण आहे किंवा नाही?इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत तरी प्रवाशांनी आपली तिकिटे सांभाळून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यास ट्रॅव्हल्स चालक मालक यांच्या मनमानी कारभाराला आळा बसल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा बोलले जात आहे तसेच प्रवाशाला यावल येथे न सोडता भुसावल येथील तापी नदी पुलाजवळ सोडून दिल्यामुळे प्रवासी तथा ग्राहक संबंधितांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सुद्धा समजले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *