परीक्षांच्या आधी महाविद्यालयांना नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉक परीक्षा बंधनकारक!

Featured महाराष्ट्र
Share This:

परीक्षांच्या आधी महाविद्यालयांना नमुना प्रश्नपत्रिका आणि मॉक परीक्षा बंधनकारक!

मुंबई (तेज समाचार डेस्क): मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा बहूपर्यायी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार विद्यार्थ्यांची महाविद्यालयाने मॉक परीक्षा घेणं बंधनकारक आहे. महाविद्यालयाने नमुना प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध केल्याबाबत आणि विद्यार्थ्यांची मॉक परीक्षा घेतल्याबाबतचा अहवाल आपल्या क्लस्टरमधील महाविद्यालयांच्या प्राचार्याना कळवावा, असे निर्देश मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने महाविद्यालयांना दिले आहेत.

तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी असलेल्या समस्या सोडवण्यासाठी महाविद्यालयात हेल्प डेक्सची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशाही सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *