
सलमान खानला का वाटतेय भीती… बघा काय म्हणतो आहे तो…
मुंबई (तेज समाचार डेस्क). काही वर्षा पूर्वी एक चित्रपट आलं होतं, ‘डरना जरूरी है’. आजच्या परिस्थितित पण हेच म्हणवे लागेल कि डरना जरूरी है. पण का जरूरी है. हे सलमान आपल्याला सागत आहे. तो म्हणतो, डरोगे, तभी जिन्दा रहोगे.
सध्या लॉकडाउनमुळे संपूर्ण देश सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. सलमान खानही कुटुंबासोबत पनवेलच्या फार्महाऊसवर आहे. सलमानने रविवारी रात्री एक वाजता इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात त्याच्यासोबत सोहेल खानचा मुलगा निर्वान खानही आहे. सलमान या व्हिडिओत सांगतो की, गेल्या तीन आठवड्यांपासून तो कुटुंबापासून लांब आहे आणि घाबरला आहे. सलमान म्हणाला की, ‘आम्ही हिम्मतीने बोलतो, बोलतो की हो आम्ही घाबरलो आहोत.’
एक मिनिट आणि 25 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सलमान स्वतःची आणि निर्वानची ओळख सांगतो. यानंतर तो म्हणतो की, ‘आम्ही काही दिवसांसाठी इथे आलो होतो. पण आता इथेच राहत आहोत. आम्ही तर घाबरलो आहोत. निर्वान सोहेबचा मुलगा आहे.’ यानंतर सलमान निर्वानला त्याने किती दिवस त्याच्या बाबांना पाहिलं नाही असा प्रश्न विचारला. यावर निर्वानने तीन आठवड्यांपासून बाबांना पाहिलं नसल्याचं सांगितलं. यानंतर सलमाननेही त्याच्या वडिलांना तीन आठवड्यांपासून पाहिलं नसल्याचं सांगितलं.