
साक्री : इंग्लिश मेडीयम शाळेच्या भिंतीलगत काही तासापूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला टाकून महिला गायब
साक्री : इंग्लिश मेडीयम शाळेच्या भिंतीलगत काही तासापूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला टाकून महिला गायब
धुळे (वाहिद काकर): साक्री शहरातील वंजार तांडा जवळ असलेल्या सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहाशेजारी गुडशेपड इंग्लिश मेडीयम शाळेच्या भिंतीलगत काही तासापूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाला टाकून महिला गायब झाल्याने साक्री शहरात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृह अधिक्षक अश्विनी वानखेडे यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरनुसार दि 28 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वसतिगृहातील मुली जेवण करून वसतिगृहाच्या मागील बाजूस बाथरूम जवळ जेवणाचे ताट धुत असतांना गुडशेपड शाळेच्या कंपाऊंडच्या भिंतीवर बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने मुलींना जाऊन बघितले असता प्लास्टिकच्या बादलीत नवजात अर्भक पालथे पडलेले दिसले .ते रडत असल्याने आजुबाजुला शोध घेतला असता कोणी दिसून आले नाही. वस्तिगुहाच्या अधिक्षिका अश्विनी वानखेडे यांना माहिती देण्यात आली. वस्तिगुहाच्या शिपाई सुनंदा परदेशी यांना सोबत घेऊन बादलीत टाकून दिलेले नवजात अर्भक बादलीतून बाहेर काढून पुरुष जातीचे अर्भकाला कपडयात गुंडाळून वस्तिगुहाचे मालक पंकज मराठे यांना फोनवरुन अर्भक सापडल्याची माहिती देण्यात आली. यासंदर्भात पोलिसांना कळविण्यात आले. साक्री ग्रामीण रुग्णालयात नवजात पुरुष जातीच्या अर्भकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अज्ञात स्त्रिने बाळाला जन्म देऊन प्लास्टिक च्या बादलीत ठेवून संगोपन आणि देखभाल नकरण्याच्या उद्देशाने बेवारस स्थितीत टाकून महिला पसार झाली आहे. यामुळे साक्री शहरात खळबळ उडाली असून संशियित महिलेचा शोध लावण्यात पोलीसांना यश आले असुन संबधीत महिला आणि तीची एक साथीदार यांना धुळे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून डीएनए चाचणी नंतर या नवजात अर्भकाच्या मातेचा उलगडा होणार आहे.