यावल नगरपरिषद अध्यक्षा आणि नगरसेवकांमध्ये सुरक्षित अंतर यावल शहरात चर्चेचा विषय

Featured जळगाव
Share This:

यावल नगरपरिषद अध्यक्षा आणि नगरसेवकांमध्ये सुरक्षित अंतर यावल शहरात चर्चेचा विषय.

यावल (सुरेश पाटील):महिला राखीव अनुसूचित जमाती राखीव प्रभागातून निवडून आलेल्या यावल नगरपरिषद अध्यक्ष सौ नोशाद मुबारक तडवी आणि यावल नगर परिषदेतील इतर 75% नगरसेवक यांच्यात नगरपालिका कामकाजात आणि सार्वजनिक कामकाजात राजकीयदृष्ट्या सुरक्षित अंतर पाळले जात असल्याने संपूर्ण राजकारणात चर्चेचा विषय सुरू झाला आहे.
यावल नगरपरिषदेतील राजकारणात कोणाची घट्ट पकड आणि वर्चस्व आहे हे सर्व आजी माजी अध्यक्ष आणि नगरसेवकांसह नागरिकांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे.परंतु गेल्या दोन तीन महिन्यापासून यावल नगरपरिषद अनेक प्रभागात जी विकास कामे होत आहे त्या कामाचे उद्घाटन/ शुभारंभ प्रसंगी इतर काही नगरसेवक अनुसूचित जमातीच्या यावल नगरपरिषद अध्यक्ष नोशाद तडवी यांना विश्वासात न घेता किंवा आमंत्रित न करता कार्यक्रम करीत आहेत.तर एखाद्यावेळेस नगराध्यक्षा यांच्या प्रभागात ज्या काही कामाचे उद्घाटन शुभारंभ होत आहे त्या ठिकाणी अध्यक्षा इतर नगरसेवकांना न बोलविता कार्यक्रम घेत असल्याचे आणि गेल्या चार दिवसापूर्वी साठवण तलावाजवळ सुद्धा साठवण तलावाची माहिती देताना अनेक नगरसेवक उपस्थित होते परंतु अध्यक्षा उपस्थित नव्हत्या यावरून दोघा गटामध्ये कोरोना संदर्भात सर्व नियमांचे पालन करून कामकाज होत असल्याने यावल नगर परिषदेची चार महिन्यांवर आलेली पंचवार्षिक आगामी निवडणुक लक्षात घेता नगरपालिकेतील राजकारणात सुरक्षित अंतरावरून मात्र यावल शहरात राजकारणात चर्चेला उधाण आले आहे तरी यावल नगरपालिकेतील आजी-माजी सदस्यांनी आपल्या सोयीसाठी राजकारण न करता यावल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गुणात्मक दर्जात्मक प्रयत्न करायला पाहिजे तसेच नगरपरिषद अध्यक्ष आणि नगरसेवक यांच्यात नेमक्या कोणत्या कारणावरून सुरक्षित अंतर पडले आहे याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *