नेटफ्लिक्सवर सफदर रहमानच्या ‘चिप्पा’व्दारे हिंदू धर्माची पुन्हा बदनामी

Featured देश
Share This:

शौकत जहॉंची थप्पड बसताच ‘हनुमान’ गेला पळून!
नेटफ्लिक्सवर सफदर रहमानच्या ‘चिप्पा’व्दारे हिंदू धर्माची पुन्हा बदनामी

पणजी शौकत जहॉं यांनी आपल्या कपड्याच्या बाह्या दुमडल्या, मग त्याच्या जवळ गेल्या आणि एक जोरदार थप्पड लगावत त्याच्या हातून नारळ ओढून घेतले. त्यानंतर ‘हनुमान’ ने आपली मान खाली घातली आणि आपली शेपटी बचावत धूम ठोकत तेथून पळून गेला. अमेरिकेच्या ऑनलाईन मीडिया स्ट्रिमिंग कंपनी असलेल्या ‘नेटफ्लिक्स’ वर पुन्हा एकदा हिंदू आणि हिंदू धर्माचा अवमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. नेटफ्लिक्सची ताजी निर्मिती असलेल्या ‘चिप्पा’ या चित्रपटातील एक क्लिप सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यात हे दृश्य आहे. यात हिंदूंचे श्रध्दास्थान असलेल्या हनुमानाची टिंगलटवाळी करण्यात आली आहे. या चित्रपटाचे लेखक आणि निर्देशकही सफदर रहमान हेच आहेत.

या चित्रपटाच्या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये दाखविण्यात आहे की, एक वृध्द मुस्लीम व्यक्ती एका मुलाला आपली पणजी दिवंगत शौकत जहॉंची कथा सांगतो. तो म्हणतो की, त्याची पणजी शौकत जहॉंला बालपणापासूनच घोडेस्वारीची आणि मुलांमध्ये खेळण्याची आवड होती. ती मुक्का मारून नारळ फोडायची. एके दिवशी ती नारळ घेऊन येत असताना तिच्यासमोर अचानक हनुमान आला आणि त्याने तिच्या हातातील नारळ हिसकावून घेऊन एका बाजूला उभा राहून हसत हसत तिच्याकडे पाहू लागला. मग शौकत जहॉंनी आपल्या हाताच्या बाह्या वर सरकवल्या आणि त्याच्या जवळ जाऊन नारळ हिसकावून घेत त्याला एक जोरदार थप्पड हाणली. त्यानंतर हनुमान मान खाली घालून तेथून पळून गेला. चित्रपटात त्याच मुलाला तो हनुमान चालीसा वाचतांना थप्पड मारण्यात येत असल्याचेही दर्शविण्यात आले आहे.

सोशल मीडियावर या अपमानजनक दृश्यामुळे हिंदू समाज अत्यंत संतप्त झाला आहे. त्यांच्या मते, याचा स्वीकार कसा करायचा? त्यांनी नेटफ्लिक्स आणि दिग्दर्शक सफदर रहमान यांच्याविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तक्रारकर्त्यांचे असेही म्हणणे आहे की, जर चित्रपट निर्मात्याला असे दाखवायचे होते की, पणजीने माकडाला थप्पड मारली तर त्याने ‘हनुमान’ म्हणण्याऐवजी माकड म्हणायला हवे होते. परंतु त्याला तर हिंदू देवतांचा अपमानच करावयाचा होता, त्यामुळे त्याने जाणीवपूर्वक हनुमान म्हटले.

नेटफ्लिक्सवर हिंदू देव-देवतांचा आणि धर्माचा अवमान करण्याचा आरोप झाल्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही याच प्लॅटफॉर्मवर ‘लैला’ च्या माध्यमातून हिंदूंप्रती व्देष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या शोमध्ये एका अशा काल्पनिक भविष्याची कल्पना करण्यात आली आहे की, ज्यामध्ये हिंदू राष्ट्रपे्रमींचे राज्यातील संपूर्ण यंत्रणेवर नियंत्रण होते. याच पार्श्‍वभूमिवर, काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रमेश सोलंकी यांनीही नेटफ्लिक्सविरूध्द पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यात म्हटले होते की, नेटफ्लिक्सच्या काही शो मध्ये जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्याचे प्रकार घडले आहे.

नेटफ्लिक्सच्या माध्यमातून संपूर्ण जगात भारताची प्रतिमा बिघडविण्याचे काम अमेरिकन कंपनी करीत असल्याचाही त्यांनी आरोप केला होता. यासोबतच, सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत ‘सेक्रेड गेम्स’, हुमा कुरेशीची ‘लैला’, राधिका आपटेची ‘घौल’ आणि स्टँण्डअप कॉमेडियन हसन मिन्हाजच्या ‘पेट्रियट ऍक्ट’ यातूनही भारताच्या प्रतिमेवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाल्याचाही सोलंकी यांचा आरोप आहे. नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार्‍या बहुसंख्य सिरीजमध्ये भारताची बदनामी करण्याचाच त्यांचा अधिक उद्देश असतो, असा घणाघाती आरोपही रमेश सोलंकी यांनी केला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *