लाकूड चोरीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार सद्दाम शहा खलील शहा संशयित आरोपीस अटक

Featured जळगाव
Share This:

लाकूड चोरीच्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार सद्दाम शहा खलील शहा संशयित आरोपीस अटक.

काल दि.2 रोजी रात्री यावल पोलिसांनी सापळा रचून केली अटक.

यावल (सुरेश पाटील): यावल तालुक्यातील गिरडगांव ग्रामपंचायत हद्दीतील लिंबाचे लहान-मोठे एकूण 37झाडे,बाभळीचे एकूण झाडे14, पळसाची एकूण झाडे 3,हीवर झाडे 9,करंज झाडे3,असे एकूण 66 झाडे अंदाजे किंमत 79 हजार 48 रुपये किमतीचे कापून कोणतीही परवानगी न घेता संमती वाचून लबाडीने मशीन, कुऱ्हाड,करवत यांचे साह्याने कापून ताब्यातील ट्रॅक्टर स्वराज्य 744 कंपनीचे लाल रंगाचे त्यामध्ये पिवळसर पट्टा असून त्यावर नंबर नसलेले व त्यासोबत एक ट्रॉली लाल रंगाची यामध्ये भरून चोरून नेले होते आणि आहे याबाबत गिरडगाव ग्रामपंचायत महिला सरपंच अलकाबाई मधुकर पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून यावल पोलीस स्टेशनला मागील वर्षी दि.13/4/ 2020 रोजी चोरीचा गुन्हा दाखल आहे त्यावेळेपासून आरोपी फरार होता त्यास काल दिनांक 2 रोजी रात्री यावल पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.
आरोपीने गेल्या वर्षभरात अटक होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले,न्यायालयात अटकपूर्व जामीन सुद्धा न मिळाल्याने आरोपी फरार असल्याने यावल पोलिसांना तपास कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता.काल दि.2बुधवार रोजी रात्री संशयित आरोपी सद्दाम शहा खलील शहा वय30 हा किनगावात असल्याची खबर यावल पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जितेंद्र खैरनार,सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान,हे.कॉ.असलम खान, पो.कॉ.सुशील घुगे,पो.कॉ.निलेश वाघ,रोहील गणेश या पथकाने संशयित आरोपी सद्दाम शहा खलील शहा यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली यामुळे तालुक्यात अवैध लाकूड व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपीकडून गुन्ह्यात गेला माल हस्तगत करणे असल्‍याने आरोपीतास यापूर्वी समज व सूचना देऊन देखील आरोपीकडून तपासात काहीएक सहकार्य न मिळाल्याने आरोपीसअटक केली नाही तर तो सदर प्रकरणाची खरी वस्तुस्थिती लपविण्याची शक्‍यता असल्याने तसेच तपासात महत्त्वाचे साक्षीदार यांच्यावर दबाव आणू शकतो या कारणाने सदर गुन्ह्याचा सखोल व सविस्तर तपास करणे असल्याने आरोपीस अटक करणे गरजेचे झाले होते सदर गुन्ह्यातील वस्तुस्थितीजन्य व साक्ष पुराव्यावरून आरोपीचा सदर गुन्ह्यात सहभाग दिसून येत असल्याने आरोपी यास अटक करणे गरजेचे असल्याने आरोपीस अटक करण्यात आली आहे,अशी माहिती यावल पोलिसांकडून मिळाली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *