
मयत सेवा निवृत्त एस.टी. चालकाचे रिपोर्ट बाबत संभ्रम कायम. आरोग्य विभाग व प्रशासन गप्प ?
मयत सेवा निवृत्त एस.टी. चालकाचे रिपोर्ट बाबत संभ्रम कायम. आरोग्य विभाग व प्रशासन गप्प ?
यावल ( सुरेश पाटिल ): यावल येथील सेवानिवृत्त अरुण मंदवाडे वय 65 यांचा जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांनी दिनांक 7 जून 2020 रोजी दिलेला रिपोर्ट निगेटिव्ह असला तरी त्यानंतर त्यांच्यावर मात्र बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल हॉस्पिटल मध्ये औषध उपचार सुरू असताना दिनांक 17 बुधवार रोजी दुपारी निधन झाले रुग्णालय व्यवस्थापकाकडून मंदवाड़े यांचा मृतदेह ज्या पद्धतीने पॅक करून दिला होता त्यानुसार अंत्ययात्रा विधी समयी उपस्थित असणाऱ्या अनेकांमध्ये तसेच शासकीय स्तरात संभ्रम निर्माण झाला असून बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल हॉस्पिटल मधून त्यादिवशी स्पष्ट रिपोर्ट काय दिलेला आहे किंवा नाही तसेच बऱ्हाणपूर मध्यप्रदेश सरकारने कोरोना निगेटिव्ह / पॉझिटिव्ह असा कोणताही रिपोर्ट दिलेला नाही तसा रिपोर्ट लवकरच यावल तालुका प्रशासनाला येणार आहे आणि तो रिपोर्ट निगेटिव्ह येईल अशी खात्री अनेकांना असली तरी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांपैकी काहींना कॉरनटाईन व्हावे लागेल असे शासकीय स्तरावर आणि यावल शहरात बोलले जात असले तरी याबाबत आज तरी आरोग्य विभाग आणि प्रशासन मौन बाळगून असून बऱ्हाणपूर येथून अधिकृत रिपोर्ट आल्याशिवाय काहीही सांगता येणार नसल्याचे संबंधित अधिकार्यांकडून समजते, तसेच दिनांक 7 जून रोजी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांनी दिलेल्या निगेटिव्ह रिपोर्ट नुसार बर्हाणपूर येथील रूग्णालय व्यवस्थापकांनी मयताचा मृतदेह ताब्यात देताना मयताच्या नातेवाईकांना लेखी स्वरूपात काय अहवाल दिलेला आहे किंवा नाही याचा स्पष्ट खुलासा जळगाव जिल्हा आरोग्य विभागाने तसेच यावल तालुका प्रशासनाने जनतेच्या माहितीसाठी तात्काळ करावा जेणेकरून नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.