
एस. आर. बी. इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऑनलाईन पद्धतीने ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा
एस. आर. बी. इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऑनलाईन पद्धतीने ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि मनोज भावसार) :शिरपुर तालुक्यातील एस. आर. बी. इंटरनॅशनल स्कूल, दहिवद येथे आज दि. २१ जून २०२० रोजी लॉकडाऊन च्या काळात ऑनलाईन पद्धतीने ‘जागतिक योग दिन’ पार पडला.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष तुकारामशेठ एस. बाविस्कर, उपाध्यक्षा सौ. भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॅा. धीरज बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर, त्याचसोबत प्राचार्य पी. एम. व्यास, प्रशासकीय अधिकारी व उपप्राचार्य श्रीराम कुऱ्हेकर आदींचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमात सध्या चालू असलेल्या कोविड-१९ ला लढण्यासाठी मुलांकडून घरुनच योग बद्दल प्रात्यक्षिके करून घेतली गेली. यात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खुप प्रतिसाद दिला. ह्या स्पर्धेत १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यालयातील प्राचार्य पी. एम. व्यास ह्यांनी योगाद्वारे बुद्धीचा विकास कसा होतो हे गुगल मिट द्वारे स्पष्ट केले व विद्यार्थ्यांना इंटर स्कुल स्पर्धेसाठी प्रवृत्त व मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर प्रात्यक्षिका साठी मुलांचे चार गट पाडण्यात आले होते. विद्यालयातील प्रथम गट इयत्ता पहिली ते दुसरी विद्यार्थ्यांचा असून ह्यात २० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यातून अनुक्रमे प्रथम पार्थ बाविस्कर व द्वितीय श्रेया पाटील ह्यांची निवड करण्यात आली. तसेच द्वितीय गट इयत्ता तिसरी ते पाचवी ह्या विद्यार्थ्यांचा असून त्यातून प्रज्ञा चौधरी, मनस्वी शर्मा, धानवी दुबे ह्यांची निवड करण्यात आली. याप्रकारेच तृतीय गट इयत्ता सहावी ते आठवी ह्या विद्यार्थ्यांचा असुन त्यात नंदिनी शिंपी, गौरी गरुड, सायली गरुड ह्यांची निवड करण्यात आली. तसेच चतुर्थ गट इयत्ता नववी ते दहावी ह्या विद्यार्थ्यांचा होता त्यातून साक्षी करंदीकर व पवित्रा देवरे ह्यांची निवड करण्यात आली. ह्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन योग नृत्य अशा नाविण्यपुर्ण स्पर्धेत क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व भौतिक विकासाच्या दृष्टीने आंतरशालेय स्तरावर आयोजित करण्यात आली होती. तसेच स्पर्धेच्या शेवटी संस्थेचे चेअरमन डॅा. धीरज बाविस्कर ह्यांनी “योगाद्वारे चिरंतन जीवन” हा संदेश दिला.
ह्या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तसेच स्पर्धेचे योग्य रितीने संचालन होण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.