रुकसना गबाब तडवी इलेकंट्रोनिक या विषयातुन राज्यात दुसरी तर नाशिक बोर्डात पहिली

Featured जळगाव
Share This:

रुकसना गबाब तडवी इलेकंट्रोनिक या विषयातुन राज्यात दुसरी तर नाशिक बोर्डात पहिली

यावल तालुक्यातील विरावली गांव राज्यात चमकले.

यावल ( सुरेश पाटील ): यावल तालुक्यातील विरावली येथील रुकसाना गवाब तडवी ह्या विध्यार्थीनीने इयत्ता 12 वि सायन्स विषतातील इलेक्ट्रॉनिक या विषयात 100 पैकी 99% गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक तर नाशिक बोर्डात पहिला क्रमांक पटकावला आहे. या बद्दल विरावली ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष एडवोकेट देवकांत पाटील यांनी रुकसाना तडवी या विद्यार्थिनीचा तिच्या परिवाराचा सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्या दिल्या.
रूकसाना ही यावल मधील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील विदयार्थीनि असून
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने यश मिळवले आहे तिची आई मोल मजुरी करत रुकसाना चे शिक्षण पूर्ण करत आहे , स्वतः घरातील सर्व कामे करून रोज शेतातील काम करून आईला मदत करून अभ्यास करत रुकसानाने खूप परिश्रम करून यश मिळवले. तिला पुढे सायन्स विभागात डिग्री पूर्ण करावयाची असल्याचे तिने सांगितले .तिच्या या यशा बद्दल विरावली चे ऍड देवकांत पाटील , साने गुरुजी माध्यमिक शाळेचे पर्यवेक्षक एम. के. पाटील सर , ग्रा. प. सदस्य पवन पाटील , पवन राजपूत , गोकुळ पाटील , सुनील पाटील , संजू तडवी , सिकंदर तडवी , दिलीप निळे , प्रताप पाटील , तुषार पाटील प्रकाश पाटील यांचे सह विरावली ग्रामस्थांसह तालुक्यातुन सर्व स्तरातून कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *