विरावली येथे नवीन ग्रामपंचायत बांधकामासाठी 20 लाख रुपये मंजूर

Featured जळगाव
Share This:

विरावली येथे नवीन ग्रामपंचायत बांधकामासाठी 20 लाख रुपये मंजूर.

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून निधी प्राप्त.

मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सौ. लताताई सोनवणे यांचा पाठपुरावा.

मंत्री गुलाबराव पाटील,
चोपडा विधानसभा आमदार सौ. लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे या तिघांचे फोटो घेणे.

यावल ( सुरेश पाटील) : यावल तालुक्यातील विरावली येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 20 लाख रुपये मंजूर झाल्याचे पत्र ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झाले. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून निधी प्राप्त करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सौ.लताताई सोनवणे माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला त्याबद्दल विरावली ग्रामस्थांकडून त्यांचे आभार मानण्यात येत असून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा विरावली ग्रामपंचायत सरपंच,शिवसेना उपजिल्हाप्रमुख यावल तालुका शेतकरी सहकारी संघाचे संचालक तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान अंतर्गत ग्राम विकास विभागाकडील पत्र क्र.
राग्रास्व–2018/प्र.क.125(भाग)/(आस्था सूचना)व राग्रास्व–2020(ग्रामपंचायत इमारत उद्दिष्टानुसार निधी वितरण करण्याबाबत सूचना) व राग्रास्व–2020प्र.क्र.2/आस्था दि.9 ऑक्टोंबर 2020( नागरी सुविधा केंद्र खोली उद्दिष्टानुसार निधी वितरण करण्याबाबत सूचना) तसेच राष्ट्रीय ग्रामस्वराज्य या कार्यालयाकडील निधी विचारणा आदेश पत्र जा.क्र.
राग्रास्वअ/ग्रापंइ बांधकाम/856/ 2020–21दि.12 ऑक्टोंबर2020 राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत विरावली येथे इमारत ग्रामपंचायतीची फार जुनी इमारत झाली असून विरावली येथे नवीन विरावली ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम मंजूर केलेले आहे.
विरावली येथे नवीन ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी मा. ना.गुलाबराव पाटील,चोपडा व यावल मतदार संघाचे आमदार सौ.लताताई सोनवणे,माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील विद्यमान सरपंच सौ.कलीमा फिरोज तडवी,उपसरपंच मनिष विश्वनाथ पाटील, ग्रा.सदस्य व इब्राहिम तडवी, निलेश लांबोळे,राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अधिकारी कक्ष जळगांव यांनी कळविले आहे तसेच विरावली ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी विरावली ग्रामस्थांनी आभार व आनंद व्यक्त केला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *