यावल : खोटी तक्रार देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

Featured जळगाव
Share This:

आरपीआय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांची मागणी

यावल ( सुरेश पाटील ). तक्रारदाराने फैजपूर डीवायएसपी व यावल पोलीस स्टेशनला खोटी तक्रार दिल्याने तक्रारदारावर गुन्हा दाखल करून ज्या विरुद्ध तक्रार केली त्या संबंधित सावकाराकडे लायसन्स आहे किंवा नाही याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी तसेच श्रीरामनगर जवळ खुल्या जागेवर चार चाकी वाहने बेवारस उभे आहेत ती वाहने पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आरपीआय ( आठवले गट ) जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी केली.
यावल पोलीस निरीक्षक यांना दिनांक 16 जुलै 2020 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल येथील मनोज उर्फ सचिन वासुदेव वारी यांनी दिनांक 1 जुलै 2020 रोजी तक्रार अर्ज दिला होता त्यावर दिनांक 14 रोजी डीवाएसपी फैजपुर यांनी यावल पोलीस स्टेशनला येऊन चौकशी केली परंतु तक्रारदार बारी यांनी ज्याच्याविरुद्ध तक्रार केली होती त्याचेशी तडजोड करून दिलेली तक्रार मागे घेतली तसेच ज्याच्याविरुद्ध अर्ज केला होता त्याच्याकडे सावकारी लायसन्स आहे किंवा नाही तसेच सावकारी बाबत, पैसे देणे घेणे बाबत करारनामा व इतर कागदपत्र पोलीस स्टेशनला जमा केले नाही अर्जदार आणि सामने वाला यांना पोलिस स्टेशनला बोलावले असता दोघांनी तडजोड करून घेतली आणि पोलिसांची दिशाभूल करून पोलिसांचा वापर करून घेतला.
अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्याचे ट्रॅक्टर सामनेवाला याचे घरासमोर कसे आणि कोणत्या नियमाने लागले होते. तक्रारदाराने सामनेवाल्यास पैसे कोणत्या कारणाने दिले होते आणि आहे. याची देखील चौकशी व्हायला पाहिजे तसेच सामनेवाला सावकारीचा धंदा करीत असून नियमानुसार सर्व जमाखर्च ठेवला आहे का ? इत्यादी सखोल चौकशी करून अर्जदाराने पोलीस बळाचा वापर करून सामनेवाल्यास गुन्ह्यातून वाचविले आहे. सामने वाल्याकडून पोलिसांनी ट्रॅक्टर आणून अर्जदाराच्या ताब्यात दिले म्हणजेच फिर्यादीत तथ्य होते आणि आहे, अर्जदाराने दिलेल्या अर्जात गंभीर स्वरूपाचा आरोप सुद्धा केला होता आणि आहे. तरी सुद्धा अर्जदाराने अर्ज मागे घेऊन कायद्याचे उल्लंघन करून खोटी फिर्याद दिली म्हणून अर्जदारावर गुन्हा दाखल करावा तसेच गुन्हा दाखल न केल्यास दिनांक 20 जुलै 2020 सोमवार पासून यावल पोस्टेला जेलभरो आंदोलन करणार असल्याचे दिलेल्या निवेदनात आरपीआय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर आरपीआय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्यासह अरुण गजरे, भिमराव गजरे, विष्णू पारधे, पप्पू पटेल, सागर गजरे, विजय गजरे, नितीन बोरेकर, जगदीश बिऱ्हाडे इत्यादी आरपीआय पदाधिकारी कार्यकर्त्यांची स्वाक्षरी आहे.

खुल्या जागेवरील चारचाकी बेवारस वाहनांची चौकशीबाबत तहसीलदारांना निवेदन.
यावल सातोद रोडवर तहसील कार्यालया पासून काही अंतरावर श्रीरामनगर जवळ खुल्या जागेवर चार चाकी वाहने बेवारस उभी असून ती वाहने पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करून कार्यवाही करणेबाबत यावल तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांच्याकडे सुद्धा आरपीआय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी निवेदन दिले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *