
पोलीओ निर्मूलनात रोटरीचे योगदान मोलाचे: डॉ. रामानंद
पोलीओ निर्मूलनात रोटरीचे योगदान मोलाचे: डॉ. रामानंद
रोटरी एंक्लेवतर्फे जळगाव पोलिओ दिन
जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि ): जगात पोलीओ निर्मूलनात रोटरीचे योगदान मोलाचे असून कोरोनामुळे आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती व प्रतीबंधात्मक काळजी घेणे गरजेचे आहे हे नागरिकांच्या आता लक्षात यायला लागले आहे असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिपादन केले.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रोटरी जळगाव एन्क्यूतर्फे शहरातील सातही रोटरी क्लबच्या सहकार्याने आयोजित जागतिक पोलीओ दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून जळगाव मनपाचे उपायुक्त संतोष वाहुळे यांची तर प्रेसिडेंट एन्क्ल्यू संगीता पाटील डिस्ट्रिक्ट 3030 चे सहसचिव डॉ.तुषार फिरके, सहप्रांतपाल योगेश भोळे, डॉ.अपर्णा मकासरे, रोटरी जळगावचे अध्यक्ष जितेंद्र ढाके, रोटरी वेस्टचे अध्यक्ष तुषार चित्ते, रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षा डॉ.रेखा महाजन, रोटरी सेंट्रलच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा भट-कासार, रोटरी गोल्ड सिटीचे अध्यक्ष विनायक बाल्दी, रोटरी स्टार्सचे अध्यक्ष धनराज कासट, रोटरी ईस्टचे अध्यक्ष भावेश शहा, मुक्ती फाऊंडेशनचे मुकुंद गोसावी यांची उपस्थिती होती.
प्रशासन व रोटरी सारख्या स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रित केलेले प्रयत्न त्याला जनतेचे मिळालेले पाठबळ यामुळे जनजागृती होऊन आज भारताला पोलीओ मुक्त देशाचा दर्जा मिळाला आहे पुढे तो कायम टिकविण्याचे प्रयत्न ही करावे लागतील असे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी भाषणात सांगितले. मुक्ती फाऊंडेशनचे मुकूंद गोसावी यांनी पोलिओ झाल्यामुळे स्वतःचे अनुभव सांगत इतरांना होऊ नाही म्हणून करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.
प्रेसिडेंट एन्क्ल्यू संगीता पाटील यांनी रोटरी 1979 पासून पोलीओ निर्मूलनाचे 122 देशात तन मन धनाने कार्य करीत असून आज 99.9 टक्के पोलीओ संपला आहे. त्याचे संपूर्ण निर्मूलन करण्याचा संकल्प रोटरी सदस्यांनी करावा असे आवाहन केले.
सूत्रसंचालन गनी मेमन यांनी तर आभार सागर मुंदडा व रोटरी सदस्यांची उपस्थिती होती. शेवटी देशाला पोलीओ मुक्त देशाचा दर्जा मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून आनंद व्यक्त करण्यात आला.