७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन

Featured जळगाव
Share This:

७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन

चोपडा (तेज समाचार  प्रतिनिधी) : रोटरी हि सेवाभावी संस्था असून नेहमीच समाजोपयोगी व सकारात्मक विचार आणि उपक्रम समाजाला देत असते. त्याचाच एक भाग म्हणून ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त एकल गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेचे उद्घाटन चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ मनिषा जीवन चौधरी यांच्या हस्ते व गटनेते जीवन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सदर स्पर्धा सत्यम , शिवम आणि सुंदरम तीन गटातून घेण्यात आली . सत्यम गटातून प्रथम क्रमांक हितांशू प्रविण मिस्त्री ( विवेकानंद विद्यालय ) , द्वितीय क्रमांक मोहिनी अरुण महाजन (महिला मंडळ माध्यमिक विद्यालय) , तृतीय क्रमांक अंशिका पवार (पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल) या स्पर्धकांनी क्रमांक मिळविले.तर शिवम गटातून प्रथम क्रमांक ऐश्वर्या शैलेश शर्मा (चावरा इंटरनॅशनल स्कूल) , द्वितीय क्रमांक आस्था दिपक साळुंखे (विवेकानंद विद्यालय ) , तृतीय क्रमांक गौरी अनंत देशमुख (चावरा इंटरनॅशनल स्कूल) या स्पर्धकांनी पटकावला तर शिवम गटातून आदित्य अनंत सपकाळे (पंकज विद्यालय ) व गौरी यशवंत जाधव (महिला मंडळ माध्यमिक विद्यालय) या दोन स्पर्धकांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली.तर सुंदरम गटातून एकमेव व प्रथम क्रमांक हिमांशू प्रविण मिस्त्री (पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल) या स्पर्धकाने पटकाविला. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून शिरीष गुजराथी , प्रिती गुजराथी व डॉ नरेंद्र अग्रवाल यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण एनक्लेव चेअर एम डब्ल्यू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस इनरव्हील क्लब तर्फे देण्यात आले.
सदर स्पर्धेच्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ मनिषा जीवन चौधरी , नगरपरिषद गटनेते जीवन चौधरी, रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले , सचिव प्रविण मिस्त्री , एनक्लेव चेअर एम डब्ल्यू पाटील , खजिनदार भालचंद्र पवार, प्रकल्प प्रमुख पंकज पाटील , सह प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर साखरे , सौ पूनम गुजराथी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर एकल गीत गायन स्पर्धेच्या कार्यक्रम प्रसंगी विलास पी पाटील, व्हि एस पाटील, नितिन अहिरराव, रूपेश पाटील, आशिष गुजराथी, डॉ शेखर वारके, धिरेंद्र जैन, प्रसन्न गुजराथी, अरुण सपकाळे, अर्पित अग्रवाल , सागर नेवे, विलास कोष्टी, चेतन टाटीया, महेंद्र बोरसे, जितेंद्र बोथरा आदि रोटरियन उपस्थित होते…

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *