यु ट्यूब वरून चोरीचे धडे घेऊन , ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या मुलाची लुट

Featured नंदुरबार
Share This:

यु ट्यूब वरून चोरीचे धडे घेऊन , ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या मुलाची लुट

 

नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : लॉकडाउनच्या काळात कामधंदा नसल्याने चोरी करण्याचे ठरविले . चोरी करण्याचे धडे त्यांनी नविन तंत्रज्ञाना म्हणजे युट्युब चा वापर करून चोरी करण्याचे धडे आरोपी सचिन मच्छिंद्र राठोड , राहुल मच्छिंद्र राठोड , सागर नवनाथ चव्हाण यांनी ऑनलाइन युट्युब द्वारे चोरी करण्याचे धडे घेतले त्याप्रमाणे स्वतः घरीच प्रात्यक्षिक करून बघितले . त्यात ते यशस्वी झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला व त्यांनी खरोखर चोरी करण्याची काम सुरू केले. त्यांनी पहिली चोरी मुंबई येथे केली. तसेच बदलापूर जिल्हा ठाणे , बीड , कोपरगाव , भुसावळ , चाळीसगाव या गावात गुन्हे केल्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले की नवीन पद्धतीने चोरी कशी करावी . याचे धडे युट्युब वरून घेतले ही बाब धक्कादायक आहे . आज पर्यंत ऑनलाईन कुरियर मधून ग्राहकाची फसवणूक झाल्याचे ऐकले होते . परंतु याठिकाणी थेट कंपनीलाच ऑनलाइन कोरियरव्दारे कंपनीची फसवणूक करणारे पोलिसांच्या ताब्यात आले आहे . संशयित आरोपी यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की , ऑनलाइन गुगल मॅप द्वारे एखादे शहर निवडून तेथील श्रीमंत वस्तीमधील कोणत्याही एका श्रीमंत व्यक्तीच्या नावाने महागड्या वस्तू ऑनलाईन बुक करत असत . त्यानंतर कोरियर सर्विस सेंटर मधून कॉल आल्यानंतर डिलिव्हरी बॉय ला घरी नसल्याचे सांगून किंवा इतर बहाणा करून एखाद्या एकांत ठिकाणी बोलवून एकाने पार्सल घेतांना बोलण्यात गुंग करून किंवा कमी पैसे द्यायचे तेवढ्यात आलेल्या ऑनलाइन पार्सलचे सिल अतिशय हुशारीने कापुन त्यातील वस्तू काढुन परत सिल करुन देत असत. त्यात साबण, दगड किंवा इतर वस्तू ठेवून त्याला पुन्हा त्या संबंधित कंपनीचे बनावट चिकटपट्टीने चिटकवून देत असत .

 

पार्सल घेण्यासाठी आलेल्या संशयित आरोपी पैसे नसल्याचे सांगून. डिलिव्हरी बॉय ला ऑनलाइन आलेले पार्सल परत करून देत असत. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित , अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले , योगेश राऊत , पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे , पोलीस नाईक राकेश मोरे , अभय राजपूत , आनंद मराठे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आवाहन केले आहे की , ऑनलाइन पार्सल बुक करतांना स्वतःच्या नावाने बुक करा तसेच ऑनलाईन वस्तू बुक केलेली नसतांना कोरियर सेंटरमधून कॉल आल्यास व एखाद्या एकांत ठिकाणी पार्सल घेण्यासाठी बोलावल्यास घेण्यासाठी जाऊ नका लागलीच संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क करून घटनेची माहिती द्या. सर्व कुरियर सर्व्हिस सेंटर यांनादेखील आव्हान करण्यात येते की, पार्सल डिलीवरी करताना दिलेल्या पत्त्याची खात्री करून मिळालेल्या पत्त्यावर घरी जाऊनच पार्सल डिलीवरी करावी जेणेकरून कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही. तसेच पार्सल बुक करतांना इसमाचे नाव , गाव , पत्ता , आधार कार्ड , मोबाईल नंबर इतर माहिती घ्यावी तसेच काही संशयास्पद आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *