आदेशाच्या कालावधीनंतर विकासकाकडून रस्ते,गटारीची बोगस,निकृष्ट कामे करून नगरपालिकेच्या माथी मारण्याचा सपाटा

Featured जळगाव
Share This:

आदेशाच्या कालावधीनंतर विकासकाकडून रस्ते,गटारीची बोगस,निकृष्ट कामे करून नगरपालिकेच्या माथी मारण्याचा सपाटा.

नगरपरिषद बांधकाम अभियंत्याचे दुर्लक्ष.मुख्याधिकार्‍यांनी कारवाई करावी.

यावल (सुरेश पाटील): नगरपरिषद हद्दीत यावल फैजपुर रोडवर पांडुरंग सराफ नगर आणि मनुदेवीच्या बाजूला असलेल्या गट नंबर693मध्ये विकासक प्रशांत कुमार सुधाकर साळी हे या गट नंबर मधील रस्ते गटारी इत्यादी सोयी सुविधांची कामे नगरपरिषदेने ठरवून दिलेल्या अटी शर्तीनुसार मुदतीत न करता बोगस,निकृष्ट,प्रतीची करीत असल्याने तसेच पांडुरंग सराफनगर मधील आणि शहरातील आजूबाजूच्या अनेक नागरिकांना तेथील कामगार,आणि इंजिनीयर दमदाटी करून आमच्या कामात अडथळा आणू नका असा दम भरीत असल्याने नागरिकांमध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे,याकडे यावल नगरपरिषद बांधकाम विभाग शाखा अभियंता यांचे दुर्लक्ष होत असल्याने मुख्याधिकारी बबन तडवी यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची वस्तूस्थिती प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कड़क कारवाई करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
यावल नगरपरिषद तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दि. 22/1/2018रोजी प्रशांत कुमार सुधाकर साळी यांना दिलेले पत्र प्रत्यक्ष बघितले असता गट नंबर 693 मधील जमिनीवर रहिवास प्रयोजनार्थ भुमिअभिलेख तात्पुरती मंजुरी विषयान्वये अभिन्यासातील रस्ते,गटारी, जलवाहिन्या छोटे पूल,मोठे पुल रस्त्यालगतचे पथदिवे इत्यादी सुविधा मुख्याधिकारी नगरपरिषद यांचे समाधान होईल असे विकसित करून ते नगरपालिकेकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी राहील असे कळविले असताना तसेच पत्रातील अटी व शर्ती क्र.11बघितली असता सदर अभिन्यासातील जमिनीलगत देण्यात आलेली परवानगी ही परवानगी दिल्यापासून एक वर्ष कालावधीसाठी वैध राहील, (म्हणजे तात्पुरती मंजुरी पत्र दि. 22/1/2018असल्याने विकास कामे 22/1/2019चे आत करणे बंधनकारक होते आणि आहे) त्यानंतर त्याच नियमानुसार मुदतवाढ घेणे बंधनकारक राहील असे नमूद केलेले असताना विकासकाने या अटी शर्तीची पूर्णपणे पायमल्ली करून तब्बल2वर्ष उशिरा म्हणजे आज जून 2021मध्ये मंजुर नकाशा प्लॅन प्रमाणे न करता बोगस निकृष्ट प्रतीची विकास काम करीत असल्याचे दिसून येत आहे, याबाबत आजूबाजूच्या पांडुरंगसराफ नगरमधील नागरिकांसह अनेकांच्या तक्रारी आहेत याकडे यावल नगरपरिषद बांधकाम शाखा अभियंता योगेश मदने यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून विकासकाचा नियुक्त इंजिनियर आणि कामावरील मजूर आजूबाजूच्या अनेक नागरिकांना व तक्रारी करणाऱ्यांना दमदाटी करीत आहे बोगस निकृष्ट काम करीत असल्याने तसेच सुरू असलेल्या रस्ते गटारी कामाबाबत तक्रारी असताना तसेच यावल नगरपरिषद बांधकाम अभियंता योगेश मदने हे कायदेशीर कारवाई करणारच नाहीत असे शहरातील सर्व विकासका मध्ये बोलले जात आहे त्यामुळे नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करून रस्ते बांधकाम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे नोंद झालेल्या प्रमाणेच होत आहेत किंवा नाही याची पाहणी करून सुरू असलेले काम तात्काळ बंद करून विकास कामे मंजूर नकाशाप्रमाणे उत्कृष्ट प्रतीचे गुणवत्तापूर्ण करण्याची तत्काळ कारवाई करावी.
अटी व शर्ती क्र.1नुसार अभिन्यासातील रस्ते,गटारी, जलवाहिन्या,छोटे पूल,मोठे पूल रस्त्यालगतचे पथदिवे इत्यादी सुविधा मुख्याधिकारी नगरपरिषद यांचे समाधान होईल असे विकसित करून ते नगरपालिकेकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी टाकली होती आणि आहे,विकासक या अटीनुसार सोयी सुविधा करीत नसल्याने यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे विकास कामाबाबत समाधान होईल का?असे सुद्धा संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
नगरपरिषदेने दिलेल्या पत्रातील अटी व शर्ती क्र.4नुसार या परवानगीची संबंधित नसलेली जमीन विकसित करणे जमीन मालकास अभिप्रेत नाही असे स्पष्ट नमूद असताना मात्र विकासक गटनंबर 693च्या पश्चिमेस आणि फैजपूर रोडवर असलेल्या मनुदेवी मंदिराजवळ सार्वजनिक वापराच्या शासकीय मालकीच्या रस्त्यावर भराव व पाईप टाकून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवून सार्वजनिक रस्ता सोयीनुसार वापरासाठी बांधकामाचा प्रयत्न करीत आहे विकासात या रस्त्याचा वापर करू शकतो परंतु त्यात तो कोणत्याही फेरबदल करू शकत नाही. त्या सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर कोणताही भराव किंवा बांधकाम करता येत नाही त्यामुळे तक्रारीनुसार यावल नगरपालिकेने तो भराव काढून टाकण्याचे पत्र दिल्यावर सुद्धा तो भराव अजून विकासकाने काढलेला नाही.यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांनी हा भराव काढून टाकण्याबाबत कारवाई करावी अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करून रहिवास प्रयोजनार्थ भुमिअभिलेख दिलेली तात्पुरती मंजुरी तात्काळ रद्द करावी अशी मागणी होत आहे.

मनुदेवीचे ठिकाण केले गायब.

गट नंबर 693जमिनीवर रहिवास प्रयोजनार्थ भुमी अभिलेख मंजुरी प्रकरण करताना विकासकाने प्लॅन नकाशा तयार करताना नगर रचना विभाग जळगाव यांच्याकडे जी माहिती नकाशे दिली किंवा त्यांना विश्वासात घेऊन गटनंबर 693 मधील उत्तरेकडच्या कोपऱ्यातील असलेल्या तसेच गेल्या साठ-सत्तर वर्षापासून महसूल दप्तरी नोंद असलेल्या श्री मनुदेवी जागेच्या ठिकाणाची नोंद आज रोजी मंजूर प्लॅन नकाशा बघितला असता मनुदेवी ठिकाणाची नोंद गायब करून टाकलेली आहे हा मोठा पंथीय भेदभाव(जय श्री चक्रधर स्वामी शास्त्र जाणकारांकडून)सुद्धा उघडकीस आल्याने संपूर्ण यावल शहरातील महाजन गल्लीत आणि मनुदेवी भक्तांमध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात येत असून याकडे प्रसिद्ध असे या महानुभाव पंथाचे सुद्धा लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *