
‘आपण आपल्या कृतीतून आपलं स्वतःचं नशिब तयार करतो’; रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेची पोस्ट
मुंबई (तेज समाचार डेस्क). सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी सुरु होती. रियाच्या अटकेनंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने प्रतिक्रिया दिली आहे. अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ‘न्याय’ असं लिहित अंकिताने ही पोस्ट शेअर केलीये. योगायोगाने किंवा नशिबाने काहीही घडत नाही. आपण आपल्या कृतीतून आपलं स्वतःचं नशिब तयार करतो. त्यालाच कर्म म्हणतात, असं अंकिताने म्हटलंय.
दरम्यान, तीन दिवसांपासून एनसीबी रियाची सतत चौकशी करत होती. गेले दोन दिवस तिची दहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आजच्या पाच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केली.