
जामिनासाठी रिया आणि शौविकने ठोठावले उच्च न्यायलयाचे दार
जामिनासाठी रिया आणि शौविकने ठोठावले उच्च न्यायलयाचे दार
मुंबई (तेज समाचार डेस्क): अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली. तर आता या दोघांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनी वकिल सतीश मानशिंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनाची मागणी केली आहे. आज यांच्या याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.
रियाला न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. कनिष्ठ न्यायालयाने रिया आणि शौविकला जामिन देण्यास नकार दिला होता.