यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूकदारांना महसूलने दिली कायदेशीर लस-मंडळ अधिकाऱ्यांनी पकडले 2 ट्रॅक्टर आणि 2 डंपर

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूकदारांना महसूलने दिली कायदेशीर लस.

मंडळ अधिकाऱ्यांनी पकडले 2 ट्रॅक्टर आणि 2 डंपर.

यावल (सुरेश पाटील): यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाळू वाहतूकदारांनी विनापरवाना वाळू वाहतुकीची सर्रास तस्करी सुरू केल्याने गेल्या8दिवसापासून यावल तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बेधडक कारवाई करून अवैध वाळू वाहतूक करीत असताना 2 ट्रॅक्टर आणि2डम्पर पकडून पुढील कार्यवाही सुरू केल्याने वाळू वाहतूक दारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे, अवैध वाळू वाहतूकदारांना महसूल कडून कायदेशीर लस टोचण्यात आल्याने अवैध वाळू वाहतूकदारांचे मानसिक आर्थिक आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.तसेच यावल पोलीस दुसरा कायदेशीर डोस अवैध वाळू वाहतूक दारांना केव्हा देणार?याकडे सुद्धा यावल तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधून आहे.
किनगाव मंडळ अधिकारी एस.टी.जगताप यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात1ट्रॅक्टर,यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी यांनी यावल परिसरात1ट्रॅक्टर,भालोद-बामणोद मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात1डप्पर,साकळी मंडळ अधिकारी पि.ए.कडनोर यांनी त्यांच्या परिसरात एक डंपर असे एकूण2ट्रॅक्टर आणि2डंपर पकडून यावल पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील दंडात्मक कारवाई सुरू असल्याने या प्रकरणात 8ते10लाख रुपये शासनाला महसूल मिळणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे या कारवाईची महसूल विभागाकडून पहिली कायदेशीर लस देण्यात आली. त्याच प्रमाणे यावल पोलिसांकडून दुसरी कायदेशीर लस अवैध वाळू वाहतूकदारांना केव्हा मिळणार आहे याकडे सुद्धा संपूर्ण महसूल विभागासह यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *