नागादेवी पाझर तलाव दुरुस्ती नंतर पुन्हा कामाचा शुभारंभ
नागादेवी पाझर तलाव दुरुस्ती नंतर पुन्हा कामाचा शुभारंभ
संपूर्ण राज्यात महाआघाडीची नवीन प्रथा सुरू होणार…… ?
इंजिनियरची घोडचुक आणि शासनाला मोठा आर्थिक फटका.
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): तालुक्यातील नागादेवी पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ काल दिनांक 14 जून रविवार रोजी शिवसेना आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती,
परंतु नागादेवी पाझर तलाव दुरुस्ती चे काम संबंधित ठेकेदाराने कोणताही शुभारंभ न करता गेल्या महिन्यातच सुरू करून टाकले होते, दुरुस्तीचे काम संपण्याच्या मार्गावर असताना काल पुन्हा शिवसेनेच्या आमदार लताताई सोनवणे यांनी शुभारंभ केल्याने तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सन 2006 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे यावल तालुक्यातील नागादेवी पाझर तलाव फुटला होता, त्यानंतर तब्बल 13 वर्षानंतर म्हणजे गेल्या वर्षी जून 2019 मध्ये तो नागदेवी पाझर तलाव दुरुस्ती करण्यात आला तेव्हा पण लाखो रुपये खर्च करण्यात आले होते, आणि आहे, परंतु गेल्या वर्षी काम सुरू असताना तत्कालीन कामावरील इंजिनीयर च्या चुकीमुळे पाझर तलावाच्या संरक्षण भिंतीखाली आधीचा एक पाइप राहून गेल्याने त्यास पुन्हा गळती लागल्याने व पाझर तलाव पुन्हा फुटून परिसरातील जीवित आणि व शेतकऱ्यांच्या जमिनीची हानी टाळण्यासाठी प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी तात्काळ पाझर तलावाचे पाणी नदीपात्रात सोडून दिले होते. त्यानंतर सततच्या पावसामुळे तलावाचे काम पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळे तसेच इंजिनीयर च्या चुकीमुळे पुन्हा यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याने शासनाला मोठा आर्थिक फटका बसला आहे, आता पुन्हा मे 2020 मध्ये कामास सुरुवात झाली होती यावर्षी पाझर तलावात पाणी साठवून परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी मोठी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा जल संधारण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी दिनांक 13 मे 2020 रोजी प्रशासकीय मान्यता आदेश काढ़ला असता संबंधित ठेकेदाराने मे महिन्यातच नागादेवी पाझर दुरुस्ती करण्याचे काम सुरू करून टाकले होते, परंतु ठेकेदाराने शिवसेना आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांना आमंत्रित न करता किंवा पूर्वसूचना न करता, तसेच कामाचे उद्घाटन न करता नागादेवी पाझर तलाव दुरुस्ती काम सुरू करून टाकले होते, यामुळे यावल तालुक्यातील पश्चिम भागातील शिवसैनिकांमध्ये ते प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती त्यामुळे प्रगतीपथावर असलेले नागादेवी पाझर तलावाचे सुरु असलेले दुरुस्ती बांधकाम थांबविण्यात आले होते, काम पूर्णत्वाच्या मार्गावर असताना काल दिनांक 14 जून 2020 रविवार रोजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते नागादेवी पाजर तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते. त्यामुळे नागादेवी पाझर तलाव दुरुस्ती नंतर शुभारंभ करण्यात आल्यामुळे असा स्तुत्य उपक्रम, राज्यातील महाआघाडी सरकार संपूर्ण राज्यात लागू करुन वेळेचा सदुपयोग करून घेणार आहे का ? याबाबत तालुक्यात मोठी चर्चा सुरू आहे.
वरील शुभारंभ कार्यक्रमादरम्यान वनक्षेत्र यावल ( पश्चिम ) हरीपुरा ( नागादेवी ) कक्ष क्र. 141 मधे ANR रोपवन योजनेअंतर्गत चेनलींक फेन्सिंगचे काम अंदाजे 32 लाख 90 हजार रुपयाचे कामाचे भूमिपूजन सुद्धा आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते आणि माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, तालुका प्रमुख रवी सोनवणे, गोपाल चौधरी, गोटू सोनवणे, शरद कोळी, संतोष खर्चे , राहुल पाटील, योगेश पाटील, दिनू साळुंखे, भाऊसाहेब धनगर, प्रकाश कोळी, सरपंच लीलाधर पाटील, बंटी तडवी, व सावखेडा परिसरातील शेतकरी, विकास सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध गावाचे सरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.