
राज्यातीत मराठा समाजास आरक्षण राखीव पदे व विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक सवलती राखावीत- सकल मराठा समाजातर्फे मागणी
राज्यातीत मराठा समाजास आरक्षण राखीव पदे व विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक सवलती राखावीत- सकल मराठा समाजातर्फे मागणी
यावल (सुरेश पाटील): आज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाज आरक्षण व शैक्षणीक सवलतीच्या मागण्यासाठी यावल तहसीलदार जितेंद्र कूवर यांच्यामार्फत शासनास निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील मराठा समाजाच्या विद्यायार्थ्यांचे २०२०ते २०२१या वर्षातील शिक्षणाचे कोणतेही नुकसान होवु नये व येत्या काळात मराठा आरक्षण नसलेली कोणत्याही शासकीय पातळीवरील अथवा इतर नोकर भरती होवु न देण्याची संपुर्ण जबाबदारी राज्यातील महाविकास आघाडी शासनाने घ्यावी तसेच मराठा आरक्षण घेवुन झालेल्या नोंकर भरती होवुन सेवेत कार्यरत असलेल्या मराठा समाज नोकदार बाधवाच्या शासकीय नोकरीवर गदा न येता आणी मराठा समाज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती आणी राखीव पदे कायम राखली जावीत या विषयी राज्य शासनाने त्वरित अध्यादेश काढवा अशी मागणी यावल येथे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली असुन या निवेदनावर यावलचे माजी नगराध्यक्ष तथा नगरपरिषदचे गटनेते अतुल वसंत पाटील , अजय आत्माराम पाटील , अॅड .देवकांत बाजीराव पाटील,दिपक नागो पाटील, विजय रमेश पाटील,विलास लक्ष्मण पवार,सुनिल दशरथ गावडे,किशोर हुनुमंत पाटील,दगडु संतोष पाटील , निर्मल राजेन्द्र पाटील,गणेश नथ्थु महाजन,संतोष पुंडलीक पाटील,मधुकर जगन्नाथ पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत .