Tushar jaware

शिरपूरातील संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारची पेटंट म्हणून मान्यता-आर सी पटेल अभियांत्रिकीतील प्राध्यापकांचे यश

Featured धुळे
Share This:

शिरपूरातील संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारची पेटंट म्हणून मान्यता-आर सी पटेल अभियांत्रिकीतील प्राध्यापकांचे यश

मुंबई (तेज समाचार डेस्क): येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी  मशीन लर्निंग या विषयात केलेल्या संशोधनाला  ऑस्ट्रेलियन सरकारने  इनोव्हेशन पेटंट म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

अलीकडील काळात मशीन लर्निंग मॉडेल्स संगणक विज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग असून विविध क्षेत्रात त्याचा वापर होत आहे. पारंपारिक सोल्यूशन्सच्या तुलनेत मशीन लर्निंग सोल्यूशन्सची चाचणी घेणे सामान्यत: कठीण असते ते सोपे व सरळ करण्याच्या दृष्टीने येथील आर सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा डॉ तुषार जावरे, प्रा रवींद्र बडगुजर, प्रा डॉ महेश डेम्बराणी, प्रा डॉ प्रशांत पाटील, प्रा डॉ नवीन हसवाणी, प्रा जितेंद्र पाटील, प्रा विनोद पाटील व प्रा  शीतल पाटील  यांनी  अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योनमुख असलेल्या मशीन लर्निंग या विषया वर आधारित संशोधन केले आहे . यात त्यांनी मशीन लर्निंग पद्धतीने बनविलेल्या  मॉडेलची कार्यक्षमता, आणि अचूकता  वाढविण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

“अ नोव्हेल मेथड ऑफ इंट्रोड्युसिंग बेसिक इलेमेंटरी डीस्टरबंसेस फोर टेस्टिंग मशीन लर्निंग मोडेल्स” या नावाने केलेल्या संशोधनाद्वारे  सादर तंत्रज्ञान हे कोणत्याही प्रकारची माहिती वा छायाचित्रांची तपासणी अधिक अचूक व योग्य पद्धतीने मशीन लर्निंग द्वारे विश्लेशित करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. मशीन लर्निंग मॉडेल्सची  चाचणी करताना प्राथमिक माहिती  डेटामध्ये असणारे  अडथळे शोधून त्याला पर्यायी चाचणी पद्धतीचा वापर करीत मॉडेल्सची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न या द्वारे केला जातो. सध्या अस्तित्वात असलेल्या विविध  मशीन लर्निंग मोडेल्सची कार्यक्षमता व अचूकता या तंत्रज्ञानाच्या वापराने वाढलेली आढळून आली आहे. सदर संशोधना द्वारे निर्मित झालेली हि नाविन्यपूर्ण पद्धत पेटंट म्हणून नोंदणी करण्यासाठीचा प्रस्ताव या प्राध्यापकांनी ऑस्ट्रेलियन सरकारच्या पेटंट विभागाकडे दाखल केला होता. या विभागाद्वारे झालेल्या कठोर परीक्षणाअंती त्यास इनोव्हेशन श्रेणीत पेटंट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील संशोधकांनी केलेल्या संशोधनाला अंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याने शिरपूर चे नांव पुन्हा एकदा जगभरातील संशोधक व संशोधन क्षेत्रात पुढे आले आहे.सदर संशोधनासाठी या प्राध्यापकांना व्हीएतनाम येथील दुय ट्यान विद्यापीठातील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता व जेष्ठ शास्रज्ञ डॉ.आनंद नायर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

प्राध्यापकांनी मिळविलेल्या  या उल्लेखनीय  यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकर चव्हाण,माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ.प्रमोद देवरे, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. प्रवीण सरोदे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख मिल्केश जैन,जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *