रेमेडिसिवीर इंजेक्शनचे हिशोब द्यावा लागेल – खा.डॉ. हिना गावित

Featured नंदुरबार
Share This:

रेमेडिसिवीर इंजेक्शनचे हिशोब द्यावा लागेल – खा.डॉ. हिना गावित

 

नंदुरबार (वैभव करवंदकर ): कोविड-19 ह्या विषाणूची लागन झालेल्या रुग्णांना रेमेडिसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकारी यांनी उसनवारी तत्त्वावर 1000 इंजेक्शन रोटरी वेलनेस सेंटर मध्ये उपलब्ध करून दिले होते. रोटरी वेलनेस सेंटर मध्ये 5000 इंजेक्शन बाहेरुन आणले आहे असे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले होते. ह्या रेमेडिसिवीर इंजेक्शनचा हिशोब जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषधी प्रशासन अधिकारी यांना द्यावा लागेल. खा.डॉ.हिना गावीत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावित देखिल उपस्थित होते. खा.डॉ.हिना गावीत म्हणाल्या की, जिल्ह्याला शासनाच्या आदेशाप्रमाणे इंजेक्शन उपलब्ध होतील. जिल्ह्यातील रूग्णांवर वेळेवर उपचार होत नसेल, इंजेक्शन मिळत नसेल तर मी जाब विचारणारच, असेही खा.गावितांनी सांगितले. केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी दिलेले मोफत इंजेक्शन श्री.रघुवंशी यांनी विक्री केले. त्यांनी सहा हजार इंजेक्शन वाटले तर उसनवारी मिळालेले एक हजार इंजेक्शन परत का केले नाही, असेही खा.गावितांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रूग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन जिल्हाधिकार्‍यांमुळे मिळू शकत नाही. म्हणून पत्रकार परिषद घेवून मी जिल्हाधिकारी यांना जाब विचारला होता. त्यानंतर प्रशासन कामाला लागले. खाजगी दवाखान्यांना ५०० रेमडीसीवर इंजेक्शन वाटप करण्यात आले. त्यात देखिल घोळ केला. रेमडीसीवर इंजेक्शनबाबत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले. रोटरी वेलनेस सेंटर रेमेडिसिवीर इंजेक्शन विक्री करण्याचा अधिकार नाही. दिनांक 09 मार्च रोजी शासनाने परिपत्रक दिला आहे की, रेमडीसीवर इंजेक्शन इतर ठिकाणी वाटप न होता कोविड हॉस्पिटलमध्ये देण्यात यावे. इंजेक्शनबाबत माजी आ.रघुवंशी राजकारण करत आहेत. रुग्णांची सेवा करत आहेत असं भासवत आहेत परंतु तसे काही नाही. माजी आ.रघुवंशी हे रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून दुकान थाटले होते. रेमेडिसिवीर इंजेक्शन गरजूंना न मिळता चेहरे पाहून वाटप होत होते. रूग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी ८ ते १० तास रांगेमध्ये उभे रहावे लागत होते.
जिल्ह्याला इंजेक्शन मिळावे, यासाठी मी विविध कंपन्यांच्या संपर्कात होती. त्यातून १५०० इंजेक्शन रूग्णालयांना उपलब्ध करून दिले. या इंजेक्शनबाबत शासनाने कोटा ठरविला आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यासाठी १.२७ टक्के इतका आहे. यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावीत म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना वाढीला, मृत्यूला सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, अन्न व औषधी प्रशासन अधिकारी आहेत. यातून गैरप्रकार करायचा होता म्हणूनच असा प्रकार केला. जिल्ह्याचा कोटा परस्पर रूग्णालयांना न देता वेलनेस सेंटरला का दिला, असाही प्रश्‍न उपस्थित केला. याबाबत अनियमीतता केली असेल त्या सर्वांची चौकशी होवून कारवाई होणार आहे, असे आ.डॉ.विजयकुमार गावीत यांनी सांगितले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *