
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अमेझॉन एक्स्पोर्ट डायजेस्ट २०२० चे प्रकाशन
अमेझॉन ग्लोबल सेलिंग वर भारतीय लघुउद्योगांची आणि ब्रँड्सची १४००० कोटी रुपये ची निर्यात
नवी दिल्ली – अमेझॉन इंडिया च्या एक्स्पोर्ट डायजेस्ट २०२० चे प्रकाशन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग, सूक्ष्म लघुआणि मध्यम उद्योग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी आज केले. “लघु आणि मध्यम उद्योगांना टिकून रहायचे असेल तर निर्यात वाढवणे हीच काळाची गरज आहे,”असे प्रतिपादन श्री गडकरी यांनी या वेळी केले.
अमेझॉन ग्लोबल सेलिंग या प्लॅटफॉर्म वर भारतीय लघुउद्योगांची आणि ब्रँड्सची आजवरची एकत्रित निर्यात विक्री २ अब्ज डॉलर (१४००० कोटी रुपये) ची झाल्याचे अमेझॉन तर्फे या वेळी घोषित करण्यात आले. येत्या २०२५ पर्यंत भारतीय ब्रँड्सची एकत्रित निर्यात विक्री १०अब्ज डॉलर (७०,००० कोटी रुपये) वर नेण्याचा निश्चय अमेझॉन ने जानेवारी २०२० मध्ये जाहीर केला होता.
अमेझॉन ग्लोबल सेलिंग च्या जगभरातील १५ वेबसाइट मदतीने ६० हजार पेक्षा जास्त भारतीय निर्यातदारांना मेड इन इंडिया उत्पादने युनायटेड स्टेट्स,यूके, यूएइ, कॅनडा, मेक्सिको,जर्मनी,इटली, फ्रान्स ,स्पेन, नेदरलँड्स, टर्की, ब्राझील, जपान, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर अशा देशातल्या ग्राहकांपर्यंत नेता येतात. सुमारे ८०० भारतीय लघु-मध्यम उद्योगांनी २०१९ मध्ये अमेझॉन ग्लोबल सेलिंग या प्लॅटफॉर्म वर १,३१,३७५ डॉलर (१ कोटी रुपये) ची निर्यात केली.
श्री गडकरी या वेळी म्हणाले, “ भारतात तयार केलेली उत्पादने अमेझॉन मार्फत जगभर पाठवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लघु-मध्यम उद्योगांचे अभिनंदन करतो. भारतीय लघु-मध्यम उद्योगांच्या कौशल्य आणि उद्योजकतेला मिळालेली ही पावतीच आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा लघु-मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि भारतीय राष्ट्रीय उत्पादनाच्या २८ टक्के तर निर्याती च्या ४८ टक्के वाटा या उद्योगांकडे आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या वातावरणातून देशाच्या आर्थिक पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत हे उद्योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. सरकार निर्यात क्षेत्राचा प्राधान्याने विचार करते आणि या उद्योगाचा निर्यातीतला वाटा ६० टक्क्यांवर जावा यावर सरकारचा भर आहे.”
अमेझॉन चे उपाध्यक्ष आणि भारतीय व्यवसायाचे प्रमुख श्री अमित अगरवाल म्हणाले, “भारतीय लघुउद्योगांची आणि ब्रँड्सची अमेझॉन ग्लोबल सेलिंग वरची वेगवान प्रगती उत्साहवर्धक आहे. या प्लॅटफॉर्म वर गेल्या १८ महिन्यांत १०० टक्के वाढून पुढील १ अब्ज डॉलर्सची उंची गाठली आहे. मात्र ही विक्री नंतरच्या एकाच वर्षात दुप्पट, म्हणजे दोन अब्ज डॉलर झाली. अमेझॉन ग्लोबल सेलिंग मुळे भारतीय उद्योगांची निर्यात झपाट्याने वाढत आहे आणि भारतीय ब्रॅण्ड्स जगात मान्यता मिळवत आहेत. लघु-मध्यम उद्योगांना निर्यात बाजारातील संधीचा लाभ घेण्यासाठी एक भक्कम तंत्रज्ञान पाया तयार करून आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे आम्हाला अभिमानास्पद आहे. भारतीय उद्योगांसाठी निर्यात व्यापार सोपा करण्याचे आणि २०२५ पर्यंत इ कॉमर्स चे व्यवहार १० अब्ज डॉलर चा टप्पा गाठतील यासाठीचे आमचे प्रयत्न सुरूच राहतील.”
सध्याच्या संकट काळात लघु-मध्यम उद्योगांना निर्यात हा मोठा आधार २०२० च्या सुरुवातीला जगापुढे एक अभूतपूर्व स्थिती उभी राहिली आणि लोकांना घरात बसून राहणे सक्तीचे झाले. मात्र याच स्थितीत हजारो लघु-मध्यम उद्योगांनी इ कॉमर्स माध्यमातून निर्यात करून जगभरात ग्राहकांना उत्पादने पुरविली. भारतीय बनावटीची आरोग्य आणि स्वच्छता राखणारी उत्पादने, नैसर्गिक पोषणवर्धके, घरगुती वापराच्या वस्तू यांची युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युरोप, मेक्सिको, जपान ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशातून असलेली मागणी प्रचंड वाढली.