लस घेण्यासाठी घरोघर जाऊन उपनगराध्यक्ष रविंद्र पवार यांची जनजागृती

Featured नंदुरबार
Share This:

लस घेण्यासाठी घरोघर जाऊन उपनगराध्यक्ष रविंद्र पवार यांची जनजागृती

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): नंदुरबार नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. रवींद्र पवार हे त्याच्या प्रभाग क्र. 03 मध्ये जाऊन प्रत्येक घरात घरात सांगत आहेत की, ” जो लस घेईन तो भविष्यामध्ये सुरक्षीत राहील” हे सांगू लस घेण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे.

शासनाच्या व नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीने शहरातील चार ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. उपनगराध्यक्ष हे शहरातील प्रभाग क्र. तीन मधिल रहिवासी श्वेता डिस्ट्रीब्युटर्स चे मालक श्री. किशोर झंवर यांच्या घरी उपनगराध्यक्ष श्री.पवार व त्यांची सहकारी जनजागृती करत असताना. तेथे उपस्थित पत्रकार सोबत संवादसत्तांना म्हणाले की, कोरोनाच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ह्या महामारी तून वाचण्यासाठी भविष्यात सुरक्षीत राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने लस घेतली पाहिजे .
उपनगराध्यक्ष श्री.पवार म्हणाले की, आमचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच नगराध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाने शहरातील चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत. त्यात (01) गुरू नानक मंगल कार्यालय , तमन्ना हॉटेल शेजारी , नंदुरबार. (02) यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुल , पटेल वाडी , नंदुरबार. (03) छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर शेजारी डोम , नंदुरबार. (04) लाल शहा नंबर 10 , लोकमान्य टिळक वाचनालया समोर , नंदुरबार. या ठिकाणी शहरातील 45 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी लाभ घ्यावा.

तसेच उपनगराध्यक्ष म्हणाले की , कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांना रेमेडिसिवीर इंजेक्शन देऊन रुग्णाचे प्राण वाचत होते. काही लोकप्रतिनिधी ह्या महामारी मध्ये स्वतः काही काम करत नाही. दुसऱ्याला काम करू देत नाही आशी नाराजी व्यक्त केली.

यावेळी उपनगराध्यक्ष श्री. रविंद्र पवारांसोबत चेतन वळवी , जयेश सोनार , सागर चित्ते , जयेश चौधरी घरोघर फिरून पोम्प्लेट देऊन जनजागृती करत होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *