
नरोत्तम सेखरिया फाउंडेशनचा रवि गोसावी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
नरोत्तम सेखरिया फाउंडेशनचा रवि गोसावी यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : येथील नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्थेचे अध्यक्ष रवि गोसावी यांना तंबाखुमुक्त अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ” ‘नरोत्तम सेखरिया फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला रवी गोसावी गेल्या 10 वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील शाळा परिसर स्वच्छ तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न राहण्यासाठी नवनिर्माण संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहेत . सदर पुरस्कार दोन वर्षापूर्वी माजी जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांना मिळाला होता. तंबाखूमुक्त नंदुरबार जिल्हा करण्यात जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी साहेब यांनी चांगला पुढाकार घेतला होता त्यानंतर आदरणीय डॉ राजेंद्र भारूड यांनी देखील त्यात सातत्य ठेवण्यासाठी वेळोवेळी जिल्हाभरातील शाळा गाव यांना मार्गदर्शन केलं .श्री रवी गोसावी यांनी नवनिर्माण संस्थेच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा वेगळे प्रशिक्षण शाळा भेटीदरम्यान केलेले मार्गदर्शन या सर्वांची कार्यपूर्ती नंदुरबार जिल्ह्यातील शाळा जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 1685 जिल्हा परिषद शाळा तंबाखूमुक्त झाल्या या कार्यासाठी रवी गोसावी यांना तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी , सध्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड सलाम मुंबई फाउंडेशन फाऊंडेशनचे श्रीमती राजश्री कदम श्रीमती कल्पना पांड्या श्री अजय पिळणकर श्री दीपक पाटील त्यांचे सहकारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये डॉ.कल्पेश चव्हाण त्यांचे पूर्ण टीम माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री कदम प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. याप्रसंगी रवी गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले की , अशा स्वरूपाचे बक्षीस पुरस्कार हे काम करण्यासाठी ऊर्जा देतात म्हणून तंबाखूमुक्त समाज तंबाखूमुक्त गाव करण्यासाठी सतत नवनिर्माण संस्थेच्या माध्यमातून आम्ही कटिबद्ध राहणार. या अशा प्रेरणादायी पुरुस्करामुळे तत्परतेने आम्ही जिल्हाभरात गावांसाठी शाळांसाठी काम करत राहू असा विश्वास त्यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 50 हजार रुपये व सन्मानचिन्हअसून येणाऱ्या काळात होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रम मध्ये याचे वितरण केले जाणार आहे.