‘रात्री कुणालाही अटक होऊ शकते’; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ

Featured मुंबई
Share This:

पुणे (तेज समाचार डेस्क): महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीने अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाख रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर देखील ईडीच्या अटकेची टांगती तलवार आहे. ईडीच्या या कारवाईवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीये.

ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे केंद्राच्या अखत्यारीत काम करते त्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही. मात्र रात्रीतून कुणालाही अटक होऊ शकते, असं खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. राज्यातील अनेक राजकिय नेत्यांच्या विरोधात ईडीकडून कारवाई सुरू आहे. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काही घडलं नसेल तर चौकशीला घाबरण्याचं कारण नाही. चौकशी होईलच, काही केलं नसेल तर निष्पन्न होणार नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात नाही, आम्ही अन्यायाच्या विरोधात आक्रमक आहोत. संजय राठोड आणि साखर कारखाना विरोधात आम्ही आवाज उठवला. महाविकास आघाडीतल्या कुठल्याही एका पक्षाच्या विरोधात नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, जोपर्यंत मनसे परप्रांतीय संदर्भात आपलं धोरण बदलत नाही तोपर्यंत युती शक्य नसल्याचं पाटलांनी सांगितलं आहे. मात्र राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवा असलेले नेतृत्व आहेत. एकट्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येण शक्य नाही. राज ठाकरे यांनी व्यापक राजकारणात आले तर युती शक्य आहे, असंही चंद्रकातं पाटील यांनी म्हटलंय.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *