राफेल भारतीय वायुसेनेत दाखल

Featured देश
Share This:

 

अंबाला  (तेज समाचार डेस्क): अवघ्या अर्ध्या तासात अंबाला (Ambala) ते पूर्व लडाखमधील पँगाँगपर्यंतचं अंतर कापू शकणारे आणि शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा राफेल विमानांचा (Rafale) ताफा आजपासून हवाई दलात दाखल झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी भारताच्या अंबाला एअरबेसवर पाच विमानांचा ताफा दाखल झाला होता. वायू दलात समावेश करण्यापूर्वी राफेल विमानांचे सर्वधर्मीयांकडून पूजन करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) ,लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) आणि वायुसेनेचे एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या उपस्थितीत राफेल विमाने भारतीय वायू दलात दाखल झाली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या साक्षीने अंबाला एअरबेस येथे राफेल विमानांचा राज्याभिषेक सोहळा झाला. पारंपरिक पद्धतीने ‘सर्वधर्म पूजन’ (Sarvadharma Pujan)करण्यात आले. मुस्लीम, शीख आणि ख्रिस्ती धर्मगुरुंनी प्रार्थना केली.

“इंडियन एअर फोर्समध्ये (Air India Force) राफेल फायटर विमानांचा समावेश हा संपूर्ण जगासाठी आणि खासकरुन आमच्या सार्वभौमत्वावर नजर ठेवणाऱ्यांसाठी एक मोठा आणि कठोर संदेश आहे”, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अंबाला हवाई तळावरील कार्यक्रमात बोलताना म्हणाले. राजनाथ सिंह यांनी नाव न घेता चीनला इशारा दिला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *