राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांचा यावल तालुका शिवसेनेतर्फे तीव्र निषेध

Featured जळगाव
Share This:

राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांचा यावल तालुका शिवसेनेतर्फे तीव्र निषेध

राज्यसभेत व्यंकय्या नायडू यांनी केला श्री छत्रपती शिवरायांचा अपमान.

यावल ( सुरेश पाटील ) : राज्य सभेत राज्य सभापती व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याने यावल तालुका शिवसेनेतर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी यावल तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.
आज दिनांक 23 जुलै 2020 गुरुवार रोजी यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याकडे यावल तालुका शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यसभेत शपथविधी सोहळा कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले हे शपथ घेत असताना श्री. छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण म्हणून जय भवानी जय शिवाजी असे बोलत असताना राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना रोखून असे म्हणू नका, म्हणून समज दिली. त्यामुळे राज्यसभा सभापती यांनी महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता असलेले श्री. छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यासारखे असून संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. म्हणून यावल तालुका शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी यावल तहसीलदार यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी लेखी निवेदन देऊन तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार सांडूसिंग पाटील, तालुकाप्रमुख रविंद्र पौलाद सोनवणे, शहर प्रमुख जगदीश रत्नाकर कवडीवाले, तालुका संघटक गोपाळ लोटन चौधरी, तालुका उपप्रमुख शरद-कोळी, विभाग प्रमुख भाऊसाहेब धनगर, शहर उपप्रमुख संतोष धोबी, उपतालुका संघटक पप्पू जोशी, माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, शहर उपप्रमुख योगेश चौधरी, विभाग प्रमुख योगेश राजपूत, आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी, सरचिटणीस युवा सेना विजय पंडित, उपशहर प्रमुख युवासेना पिंटू कुंभार, युवा सेना यावल शहर समन्वयक सागर बोरसे, युवासेना उपशहरप्रमुख प्रवीण बडगुजर, उपशहर प्रमुख निलेश पराशर, उपशहर प्रमुख मोसिम खान, शहर उपप्रमुख जितू फालक, गोकुळ आबा कोळी इत्यादी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची स्वाक्षरी निवेदनावर आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *