कांग्रेसच्या हातातून निसटत जात आहे राजस्थान
दिल्ली (तेज समाचार डेस्क) राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा वाद आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज झालेले उपमुख्यमंत्री आणि कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट रविवारी दिल्लीमध्ये पोहोचले. कांग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वादावर काहीच महिन्यांपूर्वी कांग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य शिंदें यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदें यांनी जुने मित्र सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ ट्वीट करत काँग्रेसवर टीका केली आहे. ज्योतिरादितया आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात कि ‘माझा एकेकाळचा सहकारी सचिन पायलट यालाही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्रास देऊन बाजूला काढलं, हे पाहून मला फार दु:ख होतंय. काँग्रेसमध्ये प्रतिभा आणि क्षमता यांना काँग्रेसमध्ये फार कमी महत्त्व आहे, हे यावरून दिसत आहे,’
काँग्रेसच्या हातातून अजून एक मोठं राज्य निसटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजस्थानमध्ये शनिवारपासून मोठी उलथापालथ सुरु झाली असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे भाजपच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय. सचिन पायलट यांचं काही महिन्यांपूर्वीच भाजपात गेलेले मित्र ज्योतिरादित्य शिंदें यांनी समर्थन केल आहे.
भाजपकडून घोडेबाजार करुन सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला. सरकार पाडण्याच्या आरोपाखाली राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने एफआयआरही दाखल केला आहे. या प्रकरणात 2 भाजप नेत्यांना अटक करण्यात आलीये. राजस्थानच्या एसओजीनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना नोटीस दिली आहे. ही नोटीस मिळाल्यामुळे सचिन पायलट नाराज झाले असल्याचं समजत आहे.