दारू अड्यावर धाड, पहूर पोलीसांची कारवाई 

Featured जळगाव
Share This:
पहूर ता .जामनेर – पोलीस अधिक्षक डॉ . पंजाबराव उगले  , अप्पर पोलीस अधीक्षक गोरे व  उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलिसांनी वडगांव निमशिवारात  गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला .
याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गुप्त माहितीवरून   सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेशसिंह परदेशी  , पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे ,पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, चालक संजय सोनवणे, होमगार्ड नंदू जाधव यांच्या पथकाने भल्या पहाटे  वडगाव निम शिवारातील धरणाजवळ नबीशान बाई जाफर तडवी हिचे 3 टाकी 200 लिटर कच्चामाल व नाल्या शेजारी आमिर फकिरा तडवी रा . जामठी यांचे 12 टाकी 200 लिटर प्रमाणे गावठी हातभट्टीची दारू धाड टाकून नष्ट केली .
दोन्ही मिळून सुमारे 75,500 रुपयांचा  गावठी हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करून अड्डा उद्धवस्त केला . दोन्ही आरोपी विरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून नाईक चौधरी व सुरवाडे हे तपास करीत आहेत .
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *