
राहुल गांधीशी लग्न करायला निघाली इंदूरची महिला, एयरपोर्ट वर अडवल
इंदूर (तेज समाचार डेस्क). मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने जोरदार गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. मला दिल्लीला जाऊ द्या असं म्हणत विमानतळावर गोंधळ घातला आहे. विमानाचं कोणतंही तिकीट नसताना महिलेला विमानतळावर प्रवेश करायचा होता.
सुरक्षारक्षकांनी या महिलेचं काहीही ऐकून न घेता तिला थांबवलं तेव्हा ही महिला सुरक्षारक्षकांनाच धमकी देऊ लगाली. या महिलेने सुरक्षारक्षकांना मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे असं सांगितलं. तसेच राहुल गांधी मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला जात असून त्यांच्याशी लग्न करायला जायचं आहे, असं या महिलेने सांगितलं आहे.