
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने सावद्यात रॅक पॉईंट सुरू
जळगाव (तेज समाचार प्रतिनिधि). जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर या पाच तालुक्यांतील शेतकरी, व कृषी खतं विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळणारा निर्णय घेण्यात आला. मुक्ताईनगर येथे कृषी खतं विक्रेत्यांची आढावा बैठक घेवून शेतकरी व विक्रेते यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करीत आमदार चंद्रकांत पाटील यांना मोठे यश आलेले आहे. सावदा येथे रॅक पाॅईंटला मंजूरी मिळाल्याची घोषणा राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेली आहे .
– शेतकऱ्यांना द्वावा लागायचा अतिरिक्त चार्ज
आजपर्यंत या पाचही तालुक्यांत जळगाव येथील रॅक पाॅईंट वरुन खतं वाहतुक होत होती. वाहतुक करतांना अनेक समस्या येत होत्या जास्त अंतरामुळे वितरकांना अतिरिक्त चार्ज द्यावा लागायचा. या अतिरिक्त चार्जमुळे शेतकऱ्यांना व वितरकांना जड भार सहन करावे लागत असे.वाहतूक करीत असताना नुकसान झाले तर भरपाई मिळत नव्हती.आता सावदा येथे रॅक सुरू होणार असल्याने खतांचा पुरवठा लवकर होईल आणि ते खत शेतकऱ्यांना लवकर मिळेल. सावदा येथे रॅक सुरू झाल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी केली.यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मध्य रेल्वेचे भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांना सावदा रेल्वे स्थानकावर रॅक पाॅईंट उपलब्ध करुन देण्याची सूचना करीत पालकमंत्र्यांची याची घोषणा केली. यामुळे या परिसरातील हजारो शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचणार आहे.