
आर. सी. पटेल अभियांत्रिकीचे प्रा. विजय. एस. पाटीलयांना पी.एच.डी. पदवी प्रदान
आर. सी. पटेल अभियांत्रिकीचे प्रा. विजय. एस. पाटीलयांना पी.एच.डी. पदवी प्रदान
पुणे (तेज समाचार डेस्क): येथील शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्राध्यापक श्री. विजय. एस. पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव येथील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विद्याशाखे अंतर्गत डॉक्टरेट पदवी प्रदान झाली.
‘ब्रिजिंग दी सिमँन्टीक गॅप इन कंटेन्ट बेस इमेज रेट्रिरवलं’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. या कामी त्यांना शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद. जे. देवरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. प्राध्यापक विजय. एस. पाटील यांचे संशोधनपर शोधनिबंध स्कोपस इंडेक्स डब्लू ओ एस तसेच यु.जी.सी. सारख्या राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले असुन अनेक परिसंवाद व परीषदांमध्ये त्यांनी सक्रीय सहभाग देखील नोंदविलेला आहे. ह्या संशोधनात त्यांनी प्रतिमेच्या मोठ्या डेटाबेस मधून अचूक पणे प्रतिमेची पुनर प्राप्ती कशी करावी यावर संशोधन केले, ह्या संशोधनाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्र , गुन्ह्याचा तपास यासारख्या क्षेत्रात करता येणार आहे
महाविद्यायातील या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, जनसंपर्क अधिकारी डॉ.प्रशांत महाजन, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.