प्रा. भटू बागुल ( शिंपी ) यांना पी.एच. डी. पदवी प्रदान

नंदुरबार
Share This:

प्रा. भटू बागुल ( शिंपी ) यांना पी.एच. डी. पदवी प्रदान

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): नंदुरबार येथील शिंपी समाजातील सामाजिक कार्यकर्ते प्रा. भटू बागुल ( शिंपी ) यांना पी.एच. डी. पदवी प्रदान केली आहे. प्रा. भटू बागुल हे शहादा येथील सातपुडाशिक्षण प्रसारक मंडळाच्या वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विभाग प्रमुख प्रा.भटू यशवंत बागुल यांना पी.एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथील डॉ. पी. एस. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली “ फोटोव्होल्टिक प्रोपरटीज ऑफ नॅनोस्ट्रक्चर थीक फिल्म्स ऑफ पुअर अन्ड डोप्ड सीडीटीई.” या विषयात संशोधन केले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव विद्यापीठाच्या वतीने ऑनलाईन व्हायवा घेण्यात आला होता, सदर विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव यांनी त्यांना पीएचडी पदवी प्रदान केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
प्रा. डॉ. भटू बागुल यांचे सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब जाधव , सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. आशाताई जाधव, सचिव अॅड. सुधीर जाधव, विभागीय सचिव प्रा.संजय जाधव, उपाध्यक्ष सौ. प्रतिमा जाधव, सचिव सौ. वर्षा जाधव, समन्वयक संजय राजपूत, प्राचार्य डॉ. ए.एन. पाटील, डॉ. एस. एम. पाटील तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *