पुणे : TV पाहण्यास मज्जाव केल्याने मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Featured पुणे
Share This:

पुणे (तेज समाचार डेस्क): पुण्यातील बिबवेवाडी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने उचललेल्या या पावलामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
राकेश शिंदे (वय 14, रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

राकेश हा बिबवेवाडीतील राजीव गांधी नगर परिसरात कुटुंबियांसह राहत होता. त्याला कार्टून पाहण्याची आवड होती. मंगळवारी दुपारी कार्टून पाहण्यावरून आई त्याला रागावली आणि टीव्ही बंद केला. त्यामुळे रागावलेल्या अल्पवयीन मुलगा वर असलेल्या खोलीत गेला आणि दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोखंडी अँगलला स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान बराच वेळ झाला तरी मुलगा परत येत नसल्याचे पाहून आई त्याला पाहण्यासाठी वर गेली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर आईने आरडाओरडा केल्यानंतर इतर लोकही धावून आली आणि त्याला तातडीने जवळच्या दवाखान्यात नेले, परंतु त्या आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायंकाळी पाच वाजता त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक किरण लिटे पुढील तपास करीत आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *