
पुणे: मास्क न घालणाऱ्यांवर आतापर्यंत इतका दंड वसूल
पुणे: मास्क न घालणाऱ्यांवर आतापर्यंत इतका दंड वसूल
पुणे (तेज समाचार डेस्क): पुणे शहरात कोरोनाचा फैलाव मोठा प्रमाणात होतोय. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. तरीही नागरीक मास्क न घालता घराबाहेर पडत आहेत. आशा नागरिकांवर कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत 25 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनलॉकची प्रक्रीया सुरु झाल्यापासून नागरिकांना अनेक सवलती मिळाल्या. दुकाने, मॉल ,सुरु झाले आहेत. तसेच प्रवास करण्याची बंदीही हटवण्यात आली आहे. परंतू नागरीक अनेक ठिकाणी मास्क न घालतानाच फिरताना दिसत आहेत. अशांवर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पोलिसांनी पाच हजार 204 जणांवर मास्क न घातल्याची कारवाई करत त्यांच्याकडून 25 लाखांचा दंड वसूल केला आहे.
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. दररोज 1200 पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. तरीही प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या सूचनांचे नागरिक पालन करत नाहीत. त्यामुळे मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. तसेच या पुढे देखील ही कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येने एक लाखांचा आकडा ओलांडला आहे.