
पुणे: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
पुणे: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
पुणे (तेज समाचार डेस्क): लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तरुणीने संबधित तरुणाकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने पिडीत तरुणीला शिवीगाळ, मारहाण करून दमदाटी केली. हा प्रकार जून 2015 पासून 12 डिसेंबर 2019 या कालावधीत वाकड, बाणेर, विमाननगर परिसरात घडली.
मुकुल कुमार (रा. विमाननगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकुल कुमार याने पिडीत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून त्याने पिडीत तरुणीसोबत वाकड येथील तीन सोसायट्या, बाणेर आणि विमाननगर पुणे येथील काही सोसायट्यांमध्ये नेऊन जून 2015 पासून 12 डिसेंबर 2019 या कालावधीत शरीरसंबंध ठेवले.
त्यानंतर तरुणीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने तरुणीला शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटी केली. याबाबत तरुणीने 7 सप्टेंबर 2020 रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.