पुणे महापालिकेचा आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर

Featured पुणे
Share This:

पुणे (तेजसमचार प्रतिनिधि): पुणे महापालिकेचा 2020- 21 या आर्थिक वर्षासाठीचा 7 हजार 390 कोटीचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज, बुधवारी सादर केला.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, आरपीआय (आठवले गट) च्या गटनेत्या सुनीता वाडेकर, एमआयएमच्या गटनेत्या अश्विनी लांडगे उपस्थित होत्या.

 पुणे महापालिकेचे बजेट 10 हजार कोटींपर्यंत जाऊ शकते, असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला. महसूल वाढीसाठी महसूल कक्षही स्थापन करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेची भव्य शिवसृष्टी, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, भामा – आसखेड प्रकल्प, स्मार्ट व्हिलेज, मेट्रो डीपीआर, अशा अनेक प्रकल्पांचा
अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. लालमहाल ते फडगेट पोलीस चौकीपर्यंत ग्रेड सेपरेटर तयार करणे, यासाठी चार कोटी तरतूद आहे.
 येरवडा येथील ब्रेमेन चौक परिसरात ट्रॅफिक पार्क उभारणे. डेक्कन ते पूल गेट, स्वारगेट ते पुणे स्टेशन, स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गांवरील 32 आसनी मिनी बसच्या दिवसभराच्या प्रवासासाठी 10 रुपये आकारण्या त येणार आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *