
पुणे: कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
पुणे: कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
पुणे (तेज़ समाचार डेस्क ): गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. मात्र आज चाचण्यांची संख्या वाढून देखील गेल्या काही दिवसांच्या तुलनेत अतिशय कमी रूग्ण सापडले आहेत. पुणे शहराच्या दृष्टीने ही अतिशय सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
पुण्यात आज दिवसभरात 57 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. आज 1597 जणांच्या घशाचे स्त्राव चेकअपसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 57 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 6529 वर पोहचली आहे.