पुणे विभागात आतापर्यंत 1237 रूग्ण ठणठणीत

Featured पुणे
Share This:

पुणे (तेज समाचार डेस्क): –  पुणे विभागातील 1 हजार 237 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 365 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 953 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 115 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 926 बाधीत रुग्ण असून 1 हजार 139 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 630 आहे. कोरोनाबाधित एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्ह्यातील 15 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले. जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना आहे. यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे एकूण 15 रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे 15 कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या 15 जणांना आज घरी सोडण्यात आले. कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 11 जणांना कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश  भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्हयातील 264 कोरोना बाधीत रुग्ण असून 41 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 209 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील 38 कोरोना बाधीत रुग्ण असून 28 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यत विभागामध्ये एकुण 34 हजार 64 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 32 हजार 366 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 671 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 28 हजार 969 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 365 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 92 लाख 99 हजार 876 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 2 लाख 32 हजार 714 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 176 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *