पुणे: कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या
पुणे: कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या
पुणे (तेज समाचार डेस्क): कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. कोरोनाचा धसका बहुतांश नागरिकांनी घेतला असावा. मात्र पुण्यातील कोविड उपचार केंद्रात नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 60 वर्षीय कोरोनाबाधीत रूग्णानं उपचार केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या या रूग्णाचा नुकताच कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला होता. यानंतर त्याला उपचार केंद्रात दाखल करून घेण्यात आले. त्याच्यासोबत दोन कोरोनाबाधीत रूग्णदेखील खोलीत राहायला होते. सकाळी 10 च्या सुमारास बाकीचे बाधीत रूग्ण शेजारील खोलीत नाश्ता करण्यासाठी गेले. यावेळेत या 60 वर्षीय रूग्णानं पंख्याला गळफास घेत आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, कोंढवा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून यासंबंधी पुढील तपास सुरू आहे.